कॅन्सरपासून दूर राहायचं असेल तर हे कराच...


हानिकारक केमिकल्स, रेडिएशन व अन्य कारणांनी पेशींचे डीएनए नष्ट होऊ लागतात. हीच कर्करोगाची सुरुवात असते. यामुळे पेशी वेगाने वाढू लागतात. 

यावर मात करायची असेल ताबडतोब निदान व उपचार आवश्यक आहे. "नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट' यांच्या मते खाण्यापिण्याच्या सवयी आणि सिगारेट यामुळे कर्करोग तेजीने वाढत आहे. याव्यतिरिक्त हार्मोन्स, वजन वाढ, रेडिएशन हेदेखील कर्करोगाचे कारण आहे. यापासून स्वत:ला दूर ठेवण्यासाठी काही टिप्स...

तंबाखू : धूम्रपानामुळे अनेक कर्करोग जसे की, फुप्फुसे, ब्लॅडर आणि किडनीचा कर्करोग होऊ शकतो. यामध्ये तंबाखूपासून बनलेल्या सर्व प्रकारच्या पदार्थांचा समावेश आहे.

फळे- भाज्या : खानपानाच्या सवयीत सुधारणा करा. फळे-भाज्यांचे प्रमाण वाढवा. जास्त फॅटवाले पदार्थ आणि दारूचे सेवन कमीत कमी करा.


संतुलित वजन : वजन संतुलित ठेवल्याने छाती, अंडाशय व मूत्रपिंडाच्या कर्करोगाची भीती कमी होते. यासाठी आठवड्यात १५० मिनिटांपर्यंत मॉडरेट अ‍ॅरोबिक किंवा ७५ मिनिटे अ‍ॅरोबिक फिजिकल व्यायाम करा.


सूर्यप्रकाशात जास्त वेळ घालवू नका : ज्या वेळी सूर्यप्रकाश सर्वात तीव्र असतो. त्या वेळी घराच्या बाहेर निघणे टाळा. यामुळे कर्करोगाची भीती राहणार नाही. बाहेर निघण्याआधी सनस्क्रीन अवश्य लावा.
इन्फेक्शनने इम्युनिटी : हिपॅटायटिस बी, एचपीव्ही आणि इतर व्हायरल इन्फेक्शनपासून स्वत:ला इम्युनिटी द्या.


रेग्युलर स्क्रीनिंग आणि मेडिकल टेस्ट : शक्य असेल तर वेळोवेळी स्क्रीनिंग आणि मेडिकल टेस्ट करा. ज्यामुळे कर्करोगाचे निदान लवकर होईल. डॉक्टरांशी बोलून कर्करोगाचे स्क्रीनिंग शेड्यूल तयार करा. यामुळे कर्करोगाचे निदान आणि उपचार लवकर सुरू हाेईल.
थोडे नवीन जरा जुने