त्वचा कोरडी व शुष्क असेल तर, 'ह्या' गोष्टींची काळजी घेतली पाहिजे !



त्वचेच्या नैसर्गिक आद्रतेचे नुकसान अनेक कारणांमुळे होते. अशावेळी कितीही उपाय केले तरी त्वचा कोरडी होण्यापासून वाचत नाही. त्वचातज्ज्ञांच्या मते आरोग्याशी संबंधित समस्येमुळे हा त्रास होतो.

लक्षपूर्वक निवडावा साबण



जो साबण सुवासिक आहे तो त्वचेसाठी चांगला ठरेल असे नाही. साबणात वापरले जाणारे कीटाणूविरोधी घटक त्वचेसाठी नुकसानकारक ठरू शकतात. म्हणून काळजीपूर्वक साबण निवडावा.

हे करू शकता : ज्यात सेरामाइडस असतील असा साबण निवडावा. सेरामाइड एक प्रकारचा फॅटी मालीक्यूल आहे जो त्वचेत आद्रता निर्माण करतो.


शेव करताना काळजी घ्या

शेविंगमुळे त्वचेला आद्रता देणार्‍या नैसर्गिक घटकांचे नुकसान होते. परिणामी त्वचा कोरडी होते असे त्वचातज्ज्ञांचे मत आहे. अमेरिकन अकॅडमी ऑफ डर्मेटॉलॉजीच्या मते अशी समस्या होऊ नये म्हणून अंघोळीपूर्वी शेविंग न करता अंघोळीनंतर शेविंग करावी. अंघोळीमुळे केस मऊ होतात आणि सहज कापले जातात.

हे करू शकता : केसांची वाढ ज्या दिशेने होते. त्याच दिशेने शेविंग करावी. तसेच शेविंगनंतर चेहर्‍यावर क्रिम, जेल किंवा लोशन लावावे.


चेहरा झाकावा

त्वचा कोरडी होण्याचे आणखी एक कारण म्हणजे तीव्र उन्हाची किरणे. अल्ट्राव्हायलेट किरणांमुळे त्वचेच्या दोन स्तरांचे ( एपिडर्मिस आणि डर्मिस) नुकसान होते. डर्मिस स्तरावर कोलेजन आणि इलेस्टिन फायबर असतात. तीव्र उन्हामुळे याची हानी होते. परिणामी त्वचा सैल होऊन सुरकुत्या पडतात.

हे करू शकता : उन्हात चेहरा झाकून बाहेर पडावे. सोबत सैल आणि मोकळे कपडे वापरावीत. उन्हात सनकोट, सनक्रीम, छत्रीचा वापर सुद्धा करू शकता.


थायरॉइडचा आजार

हायपोथायरॉइडिज्म असा आजार आहे, ज्यात थायरॉइड ग्रंथी कमी प्रमाणात थायरॉइड हार्मोन्स स्रवीत करते. अशाने तैल आणि घाम निर्माण करणार्‍या ग्रंथींची कार्यप्रणाली मंदावते. परिणामी त्वचेतील तजेलदारपणा कमी होतो.

हे करू शकता : आहारात विविध व्हिटामीनचा समावेश असावा. नैसर्गिक आहारावर जास्त भर द्यावा. सप्लीमेंट देखील घेऊ शकता.
थोडे नवीन जरा जुने