तुमचे मौल्यवान जीवन तुम्ही वाया घालत आहात, हे कसे ओळखाल ?


तुम्ही तुमचे जीवन कसे जगता? तुम्हाला खूप मित्रमैत्रिणी असतात,तुम्ही नेहमीप्रमाणे बाहेर फिरायला जाता,व्हेकेशनमध्ये काढलेले फोटो व सोशल मिडीयावरचे अति प्रेम यामध्ये तुम्ही गुंतून रहाता.पण तुम्हाला तुमचे आयुष्य खरंच असेच जगायचे आहे का? 

ब-याचदा झोपताना तुमच्या मनात प्रश्न डोकावतो की तुम्ही आता जसे जगत आहात तसेच तुम्हाला खरंच जगायचे आहे का ?जर या प्रश्नाचे उत्तर शोधताना तुमचा गोंधळ उडत असेल तर नक्कीच तुम्ही अनावश्यक गोष्टी व चुकीची संगत यामध्ये तुमच्या जीवनातील अमुल्य वेळ अक्षरश: वाया घालवताय.त्यामुळे फार उशीर होण्याआधीच सावध व्हा व योग्य प्रकारे जगणे सुरु करा.तसेच वाचा 

यासाठी या ५ संकेतावरुन ओळखा तुम्ही तुमचे जीवन कसे वाया घालवत आहात -

नकारात्मकता- 

जर तुम्हाला जीवन जगत असताना उत्साह वाटत नसेल.जर तुम्ही तुमचे जीवन एकतर स्वार्थीपणे अथवा स्वत:ला दोष देण्यात घालवत असाल तर तुम्हाला जीवनातील खरा आनंद मिळू शकत नाही.यासाठी विचार करा तुम्ही एखाद्या गोष्टीमुळे प्रेरीत होता का? सोशल मिडीयावरील एखाद्या प्रेरणादायी जीवनप्रवास पाहून तुम्हाला निराश व उदास वाटते का? असे असेल तर तुमच्या जीवनातील ही नकारात्मकता बाहेर काढा नाहीतर तुम्ही जीवनात कधीच चांगले विचार व त्या दृष्टीने योग्य प्रयत्न करु शकणार नाही.

ब्रेन डेड-

तुम्ही तुमच्या जीवनामध्ये तुमचे मन व मेंदू यांचा नुकताच कधी वापर केला होता? तुम्ही एखादी नवीन गोष्ट करण्याचा अथवा एखादी नवीन गोष्ट शिकण्याचा प्रयत्न केला आहे का?तुम्ही जेव्हा लोकांशी संवाद साधता तेव्हा त्यातून काहीतरी माहिती अथवा ज्ञान घेण्याचा प्रयत्न करता की केवळ बोलायचे म्हणून बोलता? लक्षात ठेवा अशा वागण्यातून आपण आपल्याच नकळत एखाद्या यंत्राप्रमाणे वागू लागतो व पुढे आपल्याला तशीच वागण्याची सवय लागते.त्यामुळे जीवन चांगल्या पद्धतीने जगण्यासाठी मेंदूचा वापर करणे फार गरजेचे आहे.वाचा

कोणतेही ध्येय नसणे-

कोणतेही ध्येय अथवा उद्देश नसल्यास तुम्ही भविष्यातील धोरणं ठरवू शकत नाही.कारण ही ध्येयं आपल्याला पुढे जाण्यासाठी व कठोर परिश्रम करण्यासाठी प्रेरणा देत असतात.असे नसेल तर येणारा प्रत्येक दिवस कंटाळवाणा होऊ शकतो.जर तुम्हाला तुमचे लहानपण अथवा किशोरवय आतापेक्षा चांगले होते असे वाटत असेल तर त्या काळात तुम्ही काय चांगलं करत होता याचा विचार करा.कदाचित असा विचार करताना तुमच्या लक्षात येईल लहानपणी तुम्ही शिक्षण,नोकरी अथवा इतर गोष्टी जाणून घेण्यासाठी अधिक उत्सुक होता.या गोष्टींचा विचार करताना कदाचित तुम्हाला तुमच्या जीवनाचे खरे उद्दीष्ट सापडू शकते.तसेच वाचा

चुकीची संगत-

जीवनातील अमुल्य वेळ चुकीच्या व अयोग्य संगतीमध्ये घालवल्याने तुमचे जीवन वाया जाऊ शकते.लोकसंग्रह व जीवनातील उदासिनता चुकीच्या संगतीकडे आकर्षित करते.कारण अशी माणसे देखील तुमच्याप्रमाणेच ध्येयवादी नसतात व त्यांचा वेळ ते अनावश्यक गोष्टी करण्यात वाया घालवत असतात.त्यामुळे अशा लोकांच्या संगतीमध्ये जीवन वाया घालवण्यापेक्षा चांगल्या व सुसंगतीमध्ये रहाण्याची सवय स्वत:ला लावा ज्यामुळे त्यांच्या प्रमाणे तुमचे जीवन देखील प्रेरणादायी व उत्साही बनेल.

५. सोशल मिडीयाचे व्यसन-

तुम्ही दिवसभरामध्ये फोन अथवा इतर गॅजेट मध्ये किती वेळ घालवता?सोशल मिडीया व व्हॉट्सएप सतत बघण्याचे तर लोकांना आजकाल व्यसनच लागले आहे.काम करताना देखील फोनपासून दूर रहाणे शक्य होत नसल्यामुळे तुम्ही तुमच्या कामावर पुरेसे लक्ष केंद्रीत करु शकत नाही.खरंतर तुमच्याकडे जीवन यशस्वी करण्याची क्षमता आहे पण अनावश्यक गोष्टींमध्ये वेळ घालविल्यामुळे तुम्हाला त्या क्षमतांचा विसर पडतो.
थोडे नवीन जरा जुने