बटाट्यामधील 'हे' औषधी गुण तुम्हाला माहित असायला हवेत !


बटाट्यामध्ये भरपूर प्रमाणात आयर्न, पोटॅशियम, फॉस्फोरस, फायबर, कॅल्शियम, प्रोटीन आणि व्हिटॅमिन ए, बी आणि सी आढळून येते. 

बटाट्यातील या गुणांमुळे याचे ज्यूस पिणे शरीरासाठी लाभदायक आहे. ज्यूस तयार करण्यासाठी डाग नसलेले, पिकलेले आणि नवीन अंकुरित बटाट्याचा वापर करावा.

बटाट्याच्या ज्युसची चव वाढवण्यासाठी यामध्ये गाजराचा ज्यूस मिसळू शकता. हे ज्यूस प्यायल्यास विविध लाभ होतील.

कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी - 

ज्या लोकांना कोलेस्ट्रॉलची समस्या असेल त्यांच्यासाठी बटाट्याचे ज्यूस रामबाण औषधीचे काम करते. जर तुम्हाला कोलेस्ट्रॉल नेहमी नियंत्रणात ठेवण्याची इच्छा असेल तर, नियमित बटाट्याचे ज्यूस प्यावे.


वजन कमी करण्यासाठी -
दररोज सकाळी नाष्टा आणि झोपण्याच्या दोन-तीन तास अगोदर बटाट्याचे ज्यूस प्यावे. यामुळे भुकेवर नियंत्रण राहील आणि वजन कमी होईल.

हृदयाशी संबधित आजारांपासून दूर राहण्यासाठी बटाटा उत्तम उपाय आहे.


बटाटा ज्यूस लिव्हर आणि गाल ब्लॅडरला स्वच्छ ठवते. प्राचीन काळात जपानी लोक हेपेटायटिस आजारामध्ये बटाट्याच्या ज्युसचा वापर करत होते.

दररोज एक ते दोन ग्लास बटाट्याचा ज्यूस पिल्यास कँसर, गॅस्ट्रिक अल्सर, डायबिटीज आणि किडनीशी संबंधित समस्या नष्ट होतात.


केसांसाठी उपयुक्त

बटाट्याच्या ज्यूसचे नियमित सेवन केल्यास केस काळे आणि मजबूत होतात. एक बटाटा घेऊन त्याची साल काढून घ्या. त्यानंतर बटाट्याचा रस काढून त्या रसामध्ये मध आणि अंड्यातील पिवळा बलक मिसळून पेस्ट तयार करून घ्या. ही पेस्ट केसांना दोन तास लावून ठेवा, त्यानंतर केस धुवून घ्या.
थोडे नवीन जरा जुने