मुलाखतीला जात असताना 'ह्या' महत्वाच्या गोष्टी ठेवा नेहमी लक्षात !प्रत्यक्ष मुलाखतीला सामोरे जाताना उमेदवारांनी घाईगर्दीने बोलण्याचे टाळावे. समोरच्या माणसांना तुमच्या गुणांची चाचपणी करण्यास वेळ द्यावा, resume नेटका तयार करावा. उमेदवाराचे उत्तर व्यवस्थित आणि मुद्देसूद आणि अकर्षक असावे. विचारल्याशिवाय अधिक माहिती देवाच्या भानगडीत पडू नये. 


उमेदवाराने नेहमी समोरच्याला सर किंवा मॅडम अशी आदरयुक्त शब्दाने हाक मारावी. मुलाखत चालू असताना खोकला किंवा शिंक आल्यास तोंडासमोर रुमाल ठेवावा. मुलाखत देताना अधिकाधिक ज्ञान, क्षमता, कौशल्य सादर करण्याचा प्रयत्न करावा.समोर बसलेल्या उमेदवाराने नेहमी समोर बसलेल्या मुख्य माणसाला उत्तर द्यावे.मुलाखतीला जाताने पुरुषाने नेहमी काली, नेव्ही ब्लु, ग्रे रंगाची ट्राउझर आणि सॉफ्ट कलर शर्ट पॉलिश केलेल काळे लेदर शूज,पांढरे सॉक्स, प्लेन टाय लावून जावे.कफलिंग किंवा चेनसारखी ज्वेलरी घातली नाही तरच उत्तम. खिशात पेन किंवा प्रवासाचे तिकीट ठेवू नये.

स्त्रियांनी काळ्या, निळ्या रंगाची पाउझर, सॉफ्ट कलर शर्ट, सॉफ्ट कलर पंजाबी ड्रेस किंवा साडी , गडद रंगाचे मेकअप टाळावे. हेअर स्टाइलमध्ये केस चेह-यावर येणार नाहीत , याची काळजी घ्यावी . काळ्या रंगाचे शूज वापरावेत, टोकदार शूज वापरू नयेत. केबिनमध्ये शिरताना घाईघाईने आत शिरू नका , संयम आणि तोल सांभाळून आत शिरावे.

आतमध्ये आल्यास सर्वप्रथम पॅनलमधील सर्व सदस्यांना अभिवादन करावे. सूचना मिळेपर्यंत खुर्चीवर बसू नये आणि बसण्याची सूचना मिळाल्यावर काही वेळा बसण्याचे साधन रिकामे नसते अशा वेळी टेबलावर रेलू नका. कोणीही काहीही बोललं तरी मनाचा तोल ढासळू देऊ नका . उत्तर नेहमी खंबीर आणि स्पष्टपणे द्यावे. बिचकतपणे उत्तरे देणे कधीही फायद्याचे ठरणार नाही.


शक्य झाल्यास मुलाखत घेणान्याच्या मनाचा मागोवा घेण्याची हातोटी तुम्हाला साधता यायला हवी . तीही तोंडी आणि अतिशय थोडक्या वेळात. महत्त्वाकांक्षी आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवावे , प्रामाणिक राहावे. वेगळ्या पद्धतीने विचारलेल्या प्रश्नांनी विचलित होऊ नका.
थोडे नवीन जरा जुने