'ह्या' गोष्टी जीवनाला बनवतात सुंदर....

लांब राहूनही काही नाती टिकविता येतात आपण प्रेमाच्या आधारावर जगसुद्धा जिंकू शकतो. जिवाची पर्वा न करता, एकमेकांना दिलेली प्रेमाची साथ, ती नाती घट्ट करतात नाहीतर माणूस सैतानासारखा वागू लागला तर माणूसकीला पोरखा होतो. आणि जवळच्या नात्याची धूळधाण उडवून टाकतो. 


हे आपण रोज वर्तमानत्रातील बातम्यातून वाचत असतो. पण ठोस पाऊल (त्याविरुद्ध) उचलत नाही. सध्याच्या वातावरणात मनाला भावणारे सध्याचे बालमनाचे चित्रच निराशाजनक आढळून येत आहे. त्याची अनेक कारणेही आहेत . समाज हा पैश्याच्या मागे धावत आहे. 

विभक्त कुटुंबातील मुलं एकाकी वाटत आहे. प्रत्येक कुटुंबाच्या समस्या वेगवगळ्या पण मुले व मुलांची मानसिकता एकच आहे. ही प्रत्येक कुटुंब निरनिराळ्या स्वभाव गुणांच्या, बुध्दीमत्तेच्या, संस्काराच्या पाया घातलेल्या खांबावर उभी आहेत. 

प्रत्येक व्यक्तीच व्यक्तिमत्त्व वेगवगळे घडत असते, पण प्रत्येक व्यक्तीमध्ये नात्यामधील प्रेमाचा एक महसूल रेशीम धागा न तुटण्याचा प्रयत्न स्र्वानी केला पाहिजे. त्यासाठ एकमेकांवर विश्वास ठेवावयास हवा. जन्मापासूनच माणसाला नाती चिकटलेली असतात. 

ती निभावून नेण्यासाठी प्रेमाचं नात मनापासून निभवाव लागतं. ते आनंदान स्वीकारले तर सगळ्यांनाच आनंद मिळतो. जीवनात आपण अनेक सुंदर कल्पना साकारत असतो. त्यातील महत्वाची कल्पना नाते संबंध, नाते संबध निर्माण करण्याचा व जोडण्यामध्ये अनेक उद्देश आहेत. जीवन सुखद व्हावं. आरामशीर असावे, सुंदर असावे. जीवन शांतपणे जगता यावे, आनंदी असावे असे अनेक हेतू त्यामागे आहेत.
थोडे नवीन जरा जुने