प्रथिनांचे अतिप्रमाणात सेवनही ठरू शकते आरोग्याला हानिकारक...


निश्चित डेली रेकमेंडेड अलाऊंसनुसार, एक निरोगी व्यक्ती, ज्याचं काम बैठे आहे, त्यांना दररोज कमीत कमी शरीराच्या वजनानुसार प्रति एक किलोग्रॅमपर 0.८ ग्रॅम प्रथिनांचे सेवन करायला हवं. यामुळे संपूर्ण दिवसाची गरज भागेल. 

जास्त प्रमाणात प्रथिनांचं सेवन हानिकारक जेव्हा खूप जास्त प्रमाणात प्रथिनांच सेवन केलं जातं, तेव्हा किडनीवर खूप जास्त दबाव पडतो, तेव्हा किडनीला सामान्यपेक्षा अधिक काम करावं लागतं. जेणेकरून रक्तातील नायट्रोजनचे अधिक प्रमाण शरीराबाहेर पडेल.

प्रथिनयुक्त पदार्थात फायबर्स नसतात खूप जास्त प्रमाणात प्रथिनयुक्त पदार्थांचं सेवन केल्यास अपचन आणि पोट फुगण्याची समस्या निर्माण होऊ शकते. एनिमल बेस्ड प्रत्येक प्रकारच्या प्रथिनामध्ये कोलेस्ट्रॉल असते. 

यामुळे हृदयाशी संबंधित आजार होण्याचा धोका वाढतो. खूप जास्त प्रमाणात एनिमल बेस्ड प्रथिनांचे सेवन करण्याने शरीरातून कॅल्शियम बाहेर पडू शकतं, ज्यामुळे ऑस्टिओपोरोसिसचा धोका वाढतो.

कमी प्रथिनांच्या सेवनाने चयापचय होते. खूप कमी प्रमाणात प्रथिनांचे सेवन न केल्यास चयापचयाचा वेग मंदावतो. रोगप्रतिकारक शक्ती मंदावते. शरीरात वॉटर रिटेंशन आणि एडिमा होऊ शकतो. केस गळू शकतात आणि नखं पातळ होऊ शकतात. 

पेशी कमजोर होऊ लागतात आणि एनिमिया होऊ शकतो. सगळ्यांची वेगळी गरज जे लोक वर्कआऊट करतात, त्यांना अधिक प्रमाणात प्रथिनांची गरज असते. एक्स्ट्रा प्रोटीन आपल्या शरीराला त्वरित ऊर्जा देतात. सामान्य व्यक्तीला प्रथिनांची आवश्यकता या तुलनेत कमी असते.
थोडे नवीन जरा जुने