जाणून घ्या काही नैसर्गिक फेसपॅकबद्दल ज्यामुळे फक्त १० मिनिटांत चेहरा गोरा होईलचेहरा गोरा होण्यासाठी लोक महागडी उत्पादने वापरतात. मात्र संवेदनशील त्वचेसाठी मात्र ही उत्पादने हानिकारक असतात. आज आम्ही तुम्हाला असे काही नैसर्गिक फेसपॅक सांगणार आहोत जे चेहऱ्यावर जादूसारखे काम करतील.

आजकाल प्रत्येकाला सुंदर आणि गोरे दिसायचे असते. गोरेपणाची ही क्रेझ केवळ महिलांमध्येच नाही तर पुरुषांमध्येही आहे. चेहऱ्यावरील डार्क स्पॉट आणि पिगमेंटेशनमुळे चेहरा काळा दिसू लागतो. तसेच धूळ आणि प्रदूषणामुळे चेहऱ्याचा ग्लो कमी होतो. 

चेहरा गोरा बनवण्यासाठी लोक विविध प्रकारचे स्किन केअर प्रॉडक्ट वापरतात. संवेदनशील त्वचेसाठी हे प्रॉडक्ट हानिकारक ठरु शकतात. याच्या वापराने काही दिवस चेहऱ्यावर फरक दिसतो मात्र त्यानंतर त्वचेसाठी हानिकारक ठरतात.

जाणून घ्या काही नैसर्गिक फेसपॅकबद्दल ज्यामुळे तुमच्या त्वचेचा रंग उजळेल

१. दुधाची साय - दुधामध्ये नैसर्गिक पोषकतत्वे आणि मिनरल्स असतात. ज्यामुळे स्किन टोन सुधारते. हा पॅक बनवण्यासाठी एक चमचा दुधाच्या सायीमध्ये चिमूटभर हळद मिसळा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावून १५ मिनिटांनी चेहरा धुवा. असे आठवड्यातून दोनवेळा करा.

२. टोमॅटोच्या रसामध्ये लिंबाचा रस मिसळून हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. सुकल्यानंतर चेहरा धुवून घ्या. हा पॅक संवेदनशील चेहऱ्यासाठी चांगला आहे.

३. बेसन आणि दही - चेहऱ्याचा काळेपणा हटवण्यासाठी बेसन, हळद आणि दही मिक्स करुन चेहऱ्यावर लावा. १५ मिनिटांनी चेहरा स्क्रब करुन थंड पाण्याने धुवा. यामुळे चेहऱ्यावरील पोर्स साफ होतील. तसेच चेहरा काही मिनिटांत गोरा दिसेल.

४. संत्रे पावडर - हा पॅक बनवण्यासाठी संत्र्याची साले सुकवून त्याची बारीक पावडक करा. यात ब्राऊन शुगर आणि रोझ वॉटर मिक्स करा. या पॅकने चेहऱ्यावर गोलाकार पद्धतीने मसाज करा. यामुळे चेहऱ्यावरील डेड स्किन दूर होईल, चेहरा साफ होईल आणि स्किन ग्लो करेल.

५. चंदन पावडर - चेहरा गोरा करण्यासाठी चंदन पावडरचा उपाय सगळ्यात बेस्ट. पॅक बनवण्यासाठी अर्धा चमचा चंदन पावडरमध्ये चिमूटभर हळद आणि ४ थेंब बदाम तेल मिक्स करा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. हा पॅक चेहऱ्याला पोषण देईल तसेच डार्क स्पॉट कमी करुन चेहऱ्याची त्वचा उजळेल.
थोडे नवीन जरा जुने