स्वस्थ, निरोगी आयुष्य जगण्यासाठी दररोज सकाळी काळ्या मिठाचे पाणी प्या !जर तुम्हाला स्वस्थ, निरोगी आयुष्य जगण्याची इच्छा असेल तर दररोज सकाळी पाण्यात काळे मीठ टाकून ते पिणे सुरु करावे. या मिश्रणाला सोल वॉटर म्हणतात असेही म्हणतात. 


या पाण्यामुळे तुमची ब्लड शुगर, ब्लडप्रेशर, ऊर्जेमध्ये सुधार, लठ्ठपणा आणि विविध प्रकारचे आजार लवकर ठीक होतील. 

लक्षात ठेवा यासाठी तुम्ही किचनमधील साधे मीठ उपयोग आणू नका. यासाठी काळे मीठच आवश्यक आहे. या मिठामध्ये 80 खनिज आणि जीवनासाठी आवश्यक असलेले नैसर्गिक तत्त्व आढळून येतात. हे सर्व पोषक तत्त्व शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत.
एक ग्लास कोमट पाण्यामध्ये अर्धा चमचा काळे मीठ टाका. या ग्लासावर प्लास्टिकचे झाकण ठेवा. त्यानंतर ग्लास चांगल्याप्रकारे हलवून घ्या. त्यानंतर 24 तास हे मिश्रण तसेच ठेवा. 24 तासानंतर मीठ पाण्यामध्ये विरघळले आहे का पाहा. त्यानंतर यामध्ये पुन्हा थोडेसे काळे मीठ टाका आणि हे पाणी प्या.

पाचन तंत्र ठीक राहते

काळ्या मिठाचे पाणी तोंडात तयार होणारी लाळ ग्रंथीला सक्रिय करण्यास मदत करते. उत्तम पाचन तंत्रासाठी हे पहिले पाऊल खूप आवश्यक आहे. पोटामध्ये नैसर्गिक मीठ, हायड्रोक्लोरिक अॅसिड आणि प्रोटीनला पचवणारे किण्वक (एन्जाइम)ला उत्तेजित करण्याचे काम करते. यामुळे खाल्लेले अन्न व्यवस्थित पचते. या व्यतिरिक्त इंटेस्‍टाइनिल ट्रॅक्ट आणि लिव्हरमध्येसुद्धा एन्जाइमला उत्तेजित होण्यास मदत मिळते. यामुळे अन्न सहजतेने पचते.


काळ्या मिठामधील उपस्थित खनिज तत्त्व आपल्या तंत्रिका तंत्रला शांत ठेवतात. हे मीठ, कोर्टिसोल आणि एड्रनलाईन यासारख्या दोन स्ट्रेस हार्मोनला कमी करते. यामुळे रात्री शांत झोप लागण्यास मदत होते. (मस्तिष्क, मेरुदंड आणि तंत्रिका (नस, शिरा) मिळून तंत्रिका तंत्र बनवतात.)


शरीर करते डिटॉक्‍स

मिठामध्ये विविध खनिज तत्त्व असल्यामुळे हे अँटीबॅक्‍टीरियलचेही काम करते. यामुळे शरीरात उपस्थित असलेल्या घातक विषारी तत्वांचा नाश होतो.


हाडांना मजबुती

अनेकांना हे माहिती नसेल की आपले शरीर आपल्या हाडांमधील कॅल्शियम आणि इतर खनिज तत्त्व शोषून घेते. यामुळे आपली हाडे कमजोर होतात. मिठाचे पाणी झालेल्या मिनरल लॉसची पूर्तता करून हाडे मजबूत करण्याचे काम करते.


त्वचेची समस्या -

मिठामधील क्रोमियम तत्व मुरुमांशी लढते तसेच सल्फरने त्वचा स्वच्छ आणि कोमल होते. या व्यतिरिक्त मिठाचे पाणी प्यायल्यास खाज आणि रॅशेसची समस्या दूर होते.
थोडे नवीन जरा जुने