शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हे उपाय करा...


शारीरिक व्याधी दूर होणे, ही एक सामान्य बाब आहे. त्याहून महत्त्वाचे म्हणजे...
जीवनात सुख, शांती, आनंद आणि उल्हास आणण्यासाठी नियमितपणे ध्यान करणे आवश्यक आहे. काही लोकांना वाटते की ध्यान करणे ही गोष्ट खूप अवघड आहे. परंतु ध्यान करणे ही गोष्ट आपण समजतो त्याप्रमाणे अवघड नाही. खाली सांगितल्याप्रमाणे प्रयोग केल्यास ब्लडप्रेशर, हार्ट अ‍ॅटॅकसारखे आजार पळून जातात आणि आपली रोगप्रतिकारक शक्तीही वाढते.

ध्यान कसे करावे ?

तुम्हाला आराम वाटेल अशा कोणत्याही एका आसनात बसा. पद्मासन किंवा वज्रासनात बसणे अधिक सोयीचे. आपले दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा. पाठ मान आणि डोके एका सरळ रेषेत असू द्या. दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. फक्त पाच मिनिटे श्वास आणि उच्छवास यावर लक्ष्य केंद्रित करा. श्वास घेताना हवा शरीरात जाते आणि बाहेर येते याकडे मनाने अतिशय बारकाईने पाहा. हा प्रयोग 30 दिवसांपर्यंत करा. नंतर पुढील 30 दिवस हाच प्रयोग रोज 10 मिनिटे करा. ही अवधी वाढवित जा. ध्यान स्वच्छ, शांत वातावरणात करा. शक्य झाल्यास स्वामी विवेकानंद यांनी लिहिलेले राजयोग हे पुस्तक वाचा. किंवा पातंजल योगदर्शन समजून घ्या. उपनिषदे आणि भगवदगीता यासारख्या ग्रंथांच्या वाचनाने ध्यान करण्याची आपली खोली वाढून मनाला शांती मिळते. परिणामी आपल्याही नकळत आपल्या शारीरिक व्याधी दूर होतात.

शारीरिक व्याधी दूर होणे, ही एक सामान्य बाब आहे. त्याहून महत्त्वाचे म्हणजे आपली वाटचाल शाश्वत आनंदाकडे होऊ लागते.
थोडे नवीन जरा जुने