केसातील कोंडा दूर करण्याची "ही" खास पध्दत तुम्हाला माहित आहे का?सध्याच्या बदलत्या लाइफस्टाइल आणि प्रदूषणामुळे केसांच्या अनेक समस्या निर्माण होत आहेत. केसात कोंडा झाल्यावर तर केसांचे खुप नुकसान होते. 


कोंडा होण्याचे कारण म्हणजे, जेवण आणि पोषकतत्त्वाची कमतरता, केसांची योग्य निगा न राखणे, जास्त रसायन असलेल्या शाम्पूचा वापर, शाम्पू नंतर केस चांगल्या प्रकारे न धुणे अशा अनेक कारणांमुळे कोंड्याची समस्या निर्माण होते.

तसे तर कोंड्याची समस्या दूर करण्यासाठी अनेक घरगुती उपाय आहेत. परंतु जर केसांची योग्य स्वच्छता केली आणि वेळोवेळी केसांची तेल मालिश केली तर कोंड्याची समस्या दूर होऊ शकते. आज आपण जाणुन घेऊया काही हर्बल उपयांविषयी, ज्यामुळे कोंड्याची समस्या दूर होईल.

1. तांदुळ शिजवल्यानंतर त्यामधील उरलेल्या पाण्याचा उपयोग कोंडा कमी करण्यासाठी केला जाऊ शकतो. या पाण्यामध्ये थोडेसे शिकाकाई पावडर मिळवुन केसांना लावा. काही वेळ ठेवल्यानंतर स्वच्छ पाण्याने केस धुवून घ्या. कोंडा दूर होईल.

2. 1-2 कप खोब-याचे तेल किंवा ऑलिव्ह ऑइल कोमट करा. यामध्ये 4 ग्राम कापुर टाका, जेव्हा कापुर पुर्णपणे विरघळेल तेव्हा या तेलाने मालिश करा. आठवड्यातुन एकदा मालिश अवश्य करा. काही काळातच कोंडा नष्ट होईल.

3. खोबरा, एरंड आणि मोहरीचे तेल समान प्रमाण मिक्स करुन घ्या. या तेलांने केसांची चांगली मालिश करा. काही काळातच कोंड्याची समस्या दूर होईल.

4. खोबरा आणि ऑलिव्ह ऑइल समान प्रमाण घ्या आणि यामध्ये थोडासा लिंबूचा रस टाका. या मिश्रणाने 10 मिनिटे केसांची मालिश करा. यानंतर टॉवेल गरम पाण्यात टाकुन गरम करुन घ्या. या टॉवेलने केसांना 3 मिनिट झाकुन घ्या. यामुळे तुम्हाला चांगला फायदा मिळेल.


5. मेथीच्या दाण्यांना रात्रभर पाण्यात टाकुन ठेवा. सकाळी हे बारीक करा आणि या पेस्टमध्ये थोडा लिंबाच्या पानांचा रस टाका. हे डोक्याला लावा आणि 45 मिनिटांनंतर केस धुवून घ्या. मानले जाते की, आठवड्यातुन एकदा असे केल्याने केसात कधीच कोंडा होत नाही.

6. जास्वंदाची फूले एकत्र करा आणि कुस्करून पेस्ट तयार करुन घ्या. ही पेस्ट केसांवर लावा. ही पेस्ट एक नॅचरल कंडीशनरचे काम करते आणि दूर करण्यास मदत करते.

7. आवळ्याचा रस आणि ऑलिव्ह ऑइल एकत्र करुन केसांची मालिश केल्यानेही कोंड्याची समस्या दूर होते.
थोडे नवीन जरा जुने