भूक लागत नाहीये?शरीर अशक्त वाटतंय,असे असेल तर 'ह्या' गोष्टी माहिती असणे गरजेचेशरीराला सुडौल बनवण्यासाठी गरजेचं आहे जीवनसत्त्व ‘ब’. या जीवनसत्त्वाच्या अभावामुळे शरीर अशक्त होतं. हातपाय गळून जातात. भूक मरते. जगण्यातील उमेद नाहीशी होते. यावरूनच ‘ब’ जीवनसत्त्व शरीराला किती लाभदायी आहे, हे लक्षात येतं.

प्रतिकारशक्ती मंदावलेले, हाता-पायांची दुखणी वाढलेले रुग्ण अनेकदा माझ्या पाहण्यात येतात. या रुग्णांच्या दुखण्यामागचं कारण असतं जीवनसत्त्व ‘ब’चा अभाव. शरीराला ऊर्जा देण्यासाठी या जीवनसत्त्वाची गरज असते. जीवनसत्त्व ‘ब’ हे प्रत्यक्षात पाण्यात विरघळणा-या आठ क्लिष्ट जीवनसत्त्वांचा समूह आहे. ‘बी कॉम्लेक्स’ या नावाने ‘ब’ जीवनसत्त्वाचा समूह ओळखला जातो. फक्त शरीराचीच नाही तर पेशींमधील ऊर्जानिर्मितीसाठी या जीवनसत्त्वाची गरज असते. कोणत्याही प्रौढ माणसास प्रत्येक दिवशी साधारण ब जीवनसत्त्वाची गरज ६५० आय.यू. (इंटरनॅशनल युनिट) युनिट इतकी असते.

‘ब’जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे होणारे आजार :


गुदाशयास कंड सुटणं, जखमा भरून न येणं, सोलपटलेले व्रण, जखमा चिघळणं, मानसिक खिन्नता, मिरगी-फेफरं, थकवा, निरुत्साह, केसांसंबंधीचे विकार, प्रतिकारशक्तीत येणारी घट, प्रजनन संबंधी विकार, शिशाचं विष पोटातच राहणं आणि त्याचं नीट उत्सर्जन न होणं, मज्जातंतू संबंधीचे विकार, दुभंग व्यक्तिमत्त्व, डोळय़ांसंबंधीचे विकार, बाळंत स्त्रियांत दूध आटणं, काचबिंदू.

अशावेळी कोणता आहार घ्यावा?

फळं : संत्री, सफरचंद, प्रून्स, कॅण्टॅलूप, जरदाळू, आलुबुखार, अक्रोड.
रस, पेयं आणि सरबतं : ढोबळय़ा मिरचीचे रंगीबेरंगी प्रकार, हिरव्या पालेभाज्या, दूध आणि त्याचे प्रकार, गाजर आणि टोमॅटो.

सूप आणि भाज्या : मोड आलेली कडधान्यं, हिरव्या पालेभाज्या, अळंबी, ब्रोकोली, स्क्वॅश, पालक, लेटय़ूस (चायनीज भाज्या) टोमॅटो, मका, जलजन्य वनस्पती.

कोशिंबिरी : ढोबळी मिरची, टोमॅटो, हिरव्या पालेभाज्यांचे प्रकार, लेटय़ूस.

चटण्या आणि लोणची : यीस्ट, मोड आलेली धान्यं, ढोबळय़ा मिरच्या, फेसलेली मोहरी, रताळे, बटाटा.

कच्च्या खाण्यास, उकडून, शिजवून आणि भाजून खाता येण्याजोग्या भाज्या : मोड आलेले मूग, ढोबळी मिरची, हिरव्या भाज्या, अळंबी, पालक, टोमॅटो, लेटय़ूस, मका, जलजन्य वनस्पती, कोंडय़ासह तांदूळ (पटणी, उकडा इ.), फक्त कोंडय़ाचे प्रकार जसे गव्हाचा कोंडा, तांदळाचा कोंडा इत्यादी. मोड आलेले शेंगदाणे, ओट्स, मोहरी, पिस्ते, घरगुती चीज, किण्वन यीस्ट, बेकरी यीस्ट, टोरुला (यीस्टचा प्रकार), रताळं, कडधान्यं आणि खजूर.
थोडे नवीन जरा जुने