'ह्या' काही टिप्स महागडे कपडे धुण्यासाठी नक्की फॉलो करा!

कपड्यावर जर खाण्याच्या पदार्थाचा डाग पडला असेल तर त्याला आधी स्वच्छ आणि थंड पाण्याने धुवा. नंतर पावडरने धुवा. बरेच लोक केवळ पाण्याने धुतात. तसे करू नये. त्यामुळे कपड्याला दुर्गंधी येते तसेच जास्त वेळ डाग राहिला असता कपड्याला कीड देखील लागू शकते.


जर तुम्ही डिझायनर कपडे जसे की जरीचे, स्टोन वर्क किंवा ग्लास वर्क तर ते कपडे नेमके कसे साफ कसे करायचे, हे तुम्हाला माहित हवे. वर्क असलेला भाग व्यवस्थित बाजूला करत केवळ फैब्रिक असलेला भागच धुवून स्वच्छ करावा.

कपडे धुताना जिथे तुम्ही कपडे धुणार असाल ती जागा धुवून निर्जंतुक करून घ्या आणि मगच तिथे कपडे धुवा.

रंगीत कपडे वेगवेगळे धुवावेत हे सगळ्यांना माहीत असतेच तसेच असे कपडे धुण्यासाठी सौम्य पावडर बाजारात उपलब्ध असते. त्याचा वापर करावा.

केवळ कपडे धुवून ठेवू नये, अधिक टिकण्यासाठी वेळच्या वेळी ते इस्त्री करून ठेवले पाहिजेत. महाग कपडे स्टीम आयर्नने प्रेस करा.

नाजुक कपड्यांना मशीनमध्ये धुवू नका.

महाग कपडे ब्रशने धुवू नका.

कपडे धुतल्यानंतर त्यांना खूप पिळून खूप झटकू नका, यामुळे कपड्याचे धागे तुटतात.
थोडे नवीन जरा जुने