हातसडीचा तांदूळ खाण्याचे हे आहेत फायदे, वाचून व्हाल आश्चर्यचकित !


सध्या हातसडीच्या तांदळाची जास्त प्रमाणात चर्चा सुरू आहे. प्रत्येक जण हातसडीचा तांदूळ खाण्याचा सल्ला देतो. काही अध्ययनांती हे सिद्ध झालं आहे की, पांढ-या किंवा पॉलिश केलेल्या तांदळापेक्षा हातसडीचा तांदूळ आरोग्यासाठी अधिक चांगला ठरतो. 

हा हातसडीचा तांदूळ आहे तरी काय? आपण जो पांढरा तांदूळ खातो त्याचं रिफाइंड न केलेलं रूप म्हणजे ब्राऊन राइस किंवा हातसडीचा तांदूळ.

हातसडीचा तांदूळ आरोग्यदायी का मानला जातो ? याचं सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे यावरील थर, तांदूळ मूलतः तीन थरांचा असतो, ब्रान, जर्म आणि एंडोस्पर्म, ब्रान आणि जर्ममध्ये प्रथिनं, फायबर्स आणि लोह भरपूर प्रमाणात असते. एंडोस्पर्ममध्ये जास्त प्रमाणात कर्बोदकं असतात. 

पण जेव्हा या तांदळाला पॉलिश केलं जातं, तेव्हा त्यातील ब्रान आणि जर्म ही दोन्ही आवरणं निघून जातात. अशाप्रकारे पांढ-या तांदळात केवळ कर्बोदकं राहतात. म्हणून हा तांदूळ आरोग्यासाठी नुकसानकारक ठरतो. तर हातसडीच्या तांदळात हे तीनही थर असतात. 

यामुळे यामध्ये कर्बोदकांबरोबरच प्रथिनं, फायबर्स, अन्य पोषक घटक असतात. ज्यामुळे हातसडीचा तांदूळ पॉलिश केलेल्या तांदळाच्या तुलनेत अधिक सरस ठरतो. मधुमेहींसाठी खाण्यायोग्य ज्या पदार्थाची ग्लाइसेमिक इंडेक्स आणि ग्लाइसेमिक लोड कमी असतो, ते रक्तातील ग्लूकोजची पातळी संतुलित ठेवतात. म्हणूनच मधुमेहींनी या तांदळाचे सेवन केलं तरी चिंतेचं कारण नाही. 

पॉलिश केलेल्या तांदळाच्या तुलनेत हातसडीच्या तांदळाची ग्लाइसेमिक इंडेक्स खूप कमी असते. म्हणून हा मधुमेहींसाठी खूप उपयुक्त ठरतो. लठ्ठ व्यक्तींनी खाल्ला तरी चिंता नाही पांढ-या तांदळाच्या तुलनेत हातसडीच्या तांदळात फायबर्स अधिक असतात. प्रति १०० ग्रॅम ब्राऊन राइसमध्ये फायबर्स साधारण २ ग्रॅम असतात, तर हे प्रमाण पॉलिश केलेल्या तांदळात १ ग्रॅमपेक्षाही कमी असते. 

हातसडीच्या तांदळात फायबर्सचं प्रमाण अधिक असल्याने थोडा खाल्ला तरी समाधान मिळतं आणि पोट भरतं. म्हणून लट्ठ व्यक्तीही कोणतीही चिंता न करता हातसडीचा तांदूळ खाऊ शकतात. रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यास साहाय्यक पॉलिश केलेल्या तांदळाच्या तुलनेत हातसडीच्या तांदुळात अनेक प्रकारचे सूक्ष्म घटक म्हणजे झिंक, सेलेनियम यांसारखे घटक भरपूर प्रमाणात असतात. हे सूक्ष्म घटक आपली रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यास साहाय्यक ठरतात . 

अ‍ॅनिमिक लोकांसाठी जास्त फायदेशीर आपल्याला दररोज जेवढी लोहाची गरज असते, ती दररोज १00 ग्रॅम हातसडीच्या तांदळाचं सेवन केलं तर पाच टक्के लोह मिळतं, तेच पॉलिश केलेल्या तांदळातून केवळ एक टक्के. यावरून तुम्हाला हा अंदाज आलाच असेल की पॉलिश केलेल्या तांदळाच्या तुलनेत हातसडीचा तांदूळ किती चांगला आहे . म्हणून अ‍ॅनिमिक लोकांना हातसडीचा तांदूळ खाण्याचा सल्ला दिला जातो.
थोडे नवीन जरा जुने