पारंपारिक पांढऱ्या तांदळा पेक्षा 'काळे' तांदूळ आरोग्यासाठी जास्त चांगले !आज पर्यंत तुम्ही कदाचित तांदूळ काळे देखील असतात हे कधी ऐकले देखील नसेल. पण आजकाल भारतामध्ये काळे तांदूळ लोकप्रिय होत आहेत. खरतर याचे कारण आपल्या पारंपारिक पांढऱ्या तांदळा पेक्षा काळे तांदूळ आरोग्यासाठी जास्त चांगले मानले जातात हे आहे. काही मिडिया रिपोर्ट्स अनुसार हे तांदूळ कैंसर सारख्या आजारापासून लढण्यासाठी फायदेशीर आहे. अनेक डॉक्टर देखील याच्या वापराचा सल्ला देत आहेत.

वापरा सोबतच काळ्या तांदळाची शेती देखील भारतामध्ये लोकप्रिय होत आहे. सुरुवातीला हा शेतीचा प्रयोग असम आणि मणिपूर सारख्या राज्यात केला गेला. त्यांना या प्रयोगात चांगला रिस्पोन्स मिळाल्याने आता काळ्या तांदळाची शेती पंजाब मध्ये देखील लोकप्रिय झाली आहे.


आरोग्याच्या सोबत याची शेती शेतकऱ्यांना चांगला आर्थिक लाभ मिळवून देऊ शकते. तुम्ही काळ्या तांदळाच्या शेती मधून पारंपारिक तांदळाच्या तुलनेत कमीतकमी 500% जास्त कमाई करू शकता. देशातील अनेक राज्यांची सरकारे देखील अश्या शेतीला प्रोत्साहन देत आहेत. तर काही राज्य याच्या प्रोडक्शनला वाढवण्यासाठी कार्य करत आहेत.

काय आहे ब्लैक राइस किंवा काळे तांदूळ
ब्लैक राइस किंवा काळे तांदूळ सामान्यतः सर्वसाधारण पणे पांढरे तांदूळ किंवा ब्राउन राइस सारखेच असतात. याची शेती सुरुवातीला चीन मध्ये होत होती. त्यानंतर ही शेती असम आणि मणिपूर मध्ये सुरु झाली. काळे तांदूळ एंटी-ऑक्सीडेंटच्या गुणांनी भरपूर असतात असे मानले जाते. तसे तर चहा आणि कॉफी मध्ये देखील एंटी-ऑक्सीडेंट असते पण काळया तांदळात याचे प्रमाण सर्वाधिक असते. यामुळे बोडी डि‍टॉक्स होते आणि अनेक आरोग्याच्या संबंधित समस्या दूर राहतात. एंटी ऑक्‍सीडेंट आपल्या शरीरातील विश्षाक्‍त संबंधी आजाराशी लढा देतो. यास कैंसरच्या इलाजासाठी सर्वात उपयोगी मानले जाते. सामान्य पांढऱ्या तांदळाच्या तुलनेत यामध्ये जास्त विटामिन बी आणि ई सोबतच कैल्शियम, मैगनीशियम, आयरन आणि जिंक यांचे प्रमाण देखील जास्त असते.


आसाम मध्ये सर्वात पहिले सुरु झाली शेती
भारतामध्ये सर्वात पहिले काळ्या तांदळाची शेती असम मधील उपेंद्र राबा यांनी 2011 मध्ये सुरु केली. उपेंद्र असम मधील ग्वालपारा जिल्हयातील आमगुरीपारा मध्ये राहतात. उपेंद्र यांना राज्याच्या कृषी विज्ञान केंद्रात काळ्या तांदळाच्या शेतीची माहिती मिळाली. त्यानंतर उपेंद्र यांचा हा प्रयोग अत्यंत यशस्वी राहिला. यानंतर आजूबाजूच्या जवळपास 200 शेतकरी देखील ही शेती करू लागले. यानंतर ही शेती मणिपूर मध्ये झाली आणि हळूहळू याची शेती नॉर्थ इस्ट मध्ये पॉपुलर झाली.

500 टक्के जास्त नफा देणारी शेती
काळ्या तांदळाची भात शेती असमच्या शेतकऱ्यांना मोठी कमाई करून देत आहे. खरतर सामान्य तांदूळ 15 ते 80 रुपये किलो विकले जातात. तर या तांदळाची किंमत 250 रुपयापासून सुरु होते. तर जर तुम्ही याचे पिक ओर्गेनिक पद्धतीने घेतले तर याची किंमत 500 रुपये प्रती किलो पर्यंत मिळू शकते. या हिशोबाने सामान्य तांदळाच्या तुलनेत काळे तांदळाची शेती 500 ते 600 टक्के जास्त नफा देऊ शकते.

याचे बियाणे कुठे मिळेल
जर तुम्हाला काळ्या तांदळाची शेती करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला नॉर्थ इस्ट किंवा मणिपूर मधून त्याचे बियाणे मागवावे लागतील. तुम्ही ऑनलाईन देखील बियाणे मागवू शकता. तुम्ही तुमचे प्रोडक्ट ई-कॉमर्स कंपन्यांना विक्री करू शकता.
थोडे नवीन जरा जुने