डोळ्यांवर ताण येण्यामागे हेही असू शकतात कारणे !


भरपूर तास काम करणे आणि इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सचा सातत्याने उपयोग या गोष्टींचा आपल्या डोळ्यांच्या क्षमतेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. डिजिटल गॅजेट्सच्या अतिवापरामुळे आपल्या नजरेवर प्रचंड परिणाम होतो व त्यातून दूरचा दृष्टिदोष किंवा जवळचा दृष्टिदोष (मायोपिया) उद्भवू शकतो. डोळ्यांवर येणा-या वाढत्या ताणामुळे गाडी चालवताना, विशेषत: रात्रीच्या वेळी गाडी चालवताना अडचण येऊ शकते. अधू दृष्टीमुळे जीवाला धोका संभवू शकतो व दृष्टिदोष असणा-या व्यक्तीसाठी गाडी चालवणे हे धोकादायक व काळजीचा विषय असू शकते.
जवळ येणा-या वस्तू, हेडलाइट्सचा उजेड किंवा मावळत्या सूर्याच्या किरणांची तिरीप यांच्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आपले डोळे सतत फिरत असतात; तेव्हा वर दिलेली लक्षणे जाणवल्यास तो धोक्याचा इशारा समजून त्याकडे त्वरित लक्ष द्यावे. गाडी चालविण्याशी संबंधित धोके टाळण्यासाठी काही प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे हे या बाबतीतला कोणताही धोका टाळण्याच्या दिशेने उचललेले पहिले पाऊल असेल.

पुढील काही गोष्टी त्यासाठी उपयुक्त ठरू शकतील : एअर कंडिशनर्समुळे हवेतील आद्र्रता कमी होते व त्यामुळे डोळ्यांतील ओलावाही सुकून गेल्याने डोळे कोरडे होतात. डोळ्यांच्या शुष्कतेमागचे हे सर्रास आढळणारे पर्यावरणीय कारण आहे. एसीचा झोत थेट तुमच्या चेह-यावर येत असेल, तर त्यामुळे डोळ्यांना सतत स्निग्धता पुरविणा-या लिपिड लेअरला हानी पोहोचते. एकदा काय स्निग्धतेच्या हा स्तर बिघडला की, डोळ्यांतील अतिरिक्त ओलावा निघून जातो व त्यांना कोरडेपणा येतो. गाडीतील एअर कंडिशनिंग कमी ठेवल्याने व त्याचा झोत चेह-यापासून दूर ठेवल्याने ही समस्या टाळता येईल.

डोळ्यांना ढाल पुरविणारे आय-वेअर : प्रखर सूर्यप्रकाश, समोरून येणा-या गाडय़ांच्या हेडलाइट्सचा थेट प्रकाश, एकाच गोष्टीकडे खूप वेळ पाहत राहणे इत्यादी गोष्टींमुळे नजर धुसर होण्याची समस्या उद्भवू शकते. संरक्षक किंवा अँटी ग्लेअर आय वेअर या समस्येपासून संरक्षण पुरवू शकतात. प्रखर उजेडामध्ये सनग्लासेस घातल्याने तुमच्या डोळ्यांना हानिकारक यूव्ही किरणांपासूनही संरक्षण मिळते. अन्यथा ही किरणे डोळ्यांच्या नाजूक पेशींनी अपाय घडवू शकतात.

भरपूर पाणी प्या : पुरेशा प्रमाणात पाणी किंवा इतर द्रवपदार्थ प्यायल्याचा डोळ्यांना फायदा होतोच, पण त्याचबरोबर गाडी चालविताना लागणारी एकाग्रताही वाढते. थोडी विश्रांती घ्या, गाडी चालविण्यासाठी योग्य वेळ निवडा : दर दोन तासांनी १५ मिनिटांची विश्रांती घ्या तसेच आधीच थकलेले असताना लांबच्या प्रवासासाठी निघू नका. यामुळे तुमच्या डोळ्यांना आराम मिळेल व ताजेतवाने झाल्याने मेंदूही पुन्हा तरतरीत होऊन अवधान देण्याची क्षमता वाढेल.

डोळ्यांना ताजेतवाने करा : डोळ्यांना झालेला त्रास कमी करण्यासाठी आयड्रॉप्सची मदत होऊ शकते. एखाद्या वस्तूकडे खूप वेळासाठी पाहत राहिल्यामुळे पापण्यांची उघडझाप लक्षणीय प्रमाणात कमी होऊ शकते. ही उघडझाप जितकी कमी तितके तुमचे डोळे कोरडे होण्याची, त्यांना त्रास होण्याची शक्यता जास्त. डोळ्यांना ताजेतवाने करणारे व डोळ्यांना येणारी खाज कमी करण्यासाठी आय ड्रॉप्स वापरणे हा या समस्येवरील उपाय आहे.

अशाप्रकारे भविष्यात दृष्टीशी संबंधित समस्यांची शक्यता कमी करण्यासाठी आपल्या डोळ्यांचे स्वास्थ्य टिकवणे आवश्यक आहे.
डोळ्यांवर ताण येत असल्याची काही लक्षणे:

>डोळे दुखणे, थकणे, डोळ्यांची जळजळ होणे किंवा डोळ्यांना खाज सुटणे
>डोळे पाणावणे किंवा कोरडे होणे
>मान, खांदे आणि पाठदुखी
>प्रकाश सहन न होणे
>एकाग्रता साधताना त्रास होणे
>डोकेदुखी
>मळमळणे
थोडे नवीन जरा जुने