तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याचे शत्रू आहेत "हे" पदार्थ !


जंकफूडवर जास्त अवलंबून राहिल्यास बालकांपासून प्रौढ व्यक्तींपर्यंत सर्वांनाच अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. जंकफूडचा विपरीत परिणाम मेंदूशी संबंधित कार्यावर होतो. त्याचप्रमाणे इतर आरोग्य समस्या वाढू शकतात.

जंकफूडचा मानसिक आणि शारीरिक परिणाम कोणता हे जाणून घेण्यासाठी...

नैराश्य

आहारात ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिडची कमतरता होणे आणि रिफाइंड कार्ब्सचे प्रमाण वाढल्याने रक्तामधील साखरेत अनियमितता होण्याची शक्यता वाढते. अशावेळी पीडित व्यक्तीला थकवा आणि आळसाचा
त्रास जाणवतो. नैराश्य वाढवणा-या घटकांमध्ये जंकफूडचा समावेश होतो.


भूक न लागणे
जंकफूड, फ्राइड किंवा प्रोसेस्ड आहारामुळे ट्रान्सफॅटचे प्रमाण वाढते. फॅट वाढल्याने मेंदूला मिळणारे संकेत प्रभावित होतात. भूक ही मेंदूकडून नियंत्रित केली जात असते. मेंदूला मिळणारे संकेत प्रभाव झाल्यामुळे भूक लागत नाही. तसेच अनेकवेळा भूक लागल्याचा भास होतो, पण जेवण जात नाही, अशी समस्या जाणवते. त्याचप्रमाणे ओव्हरइटिंगची समस्या होते. ओव्हरइटिंगमुळे वजन वाढण्याचा धोका असतो.

हायपर अ‍ॅक्टिव्हिटी
कृत्रिम रंग आणि प्रक्रिया केलेले जंकफूडचे अधिक सेवन केल्याने व्यक्तीच्या व्यवहारावर विपरीत परिणाम होतो. वैज्ञानिक भाषेत याला हायपर अ‍ॅक्टिव्हिटी म्हणतात. यात व्यक्तीचा स्वभाव चिडचिडा होतो. लहानसहान गोष्टींचा लगेच राग येतो. पीडित व्यक्ती विनाकारण चिंतेत अडकण्याची शक्यता जास्त वाढते.

अल्जायमर
कृत्रिम गोडवा निर्माण करण्यासाठी वापरले जाणारे सॅक्रोलॉजमुळे स्मरणशक्तीचे नुकसान होते. स्वीडनच्या कॅरोलिस्का इन्स्टिट्यूटच्या संशोधकांनी फास्ट फूड किंवा जंकफूडचा मेंदूवर होणारा परिणाम जाणून घेण्यासाठी जेव्हा उंदरांना डोस दिला, निरीक्षणात असे दिसून आले की याचा न्यूरोकेमिस्ट्रीवर वाईट परिणाम होतो. अशाने अल्झायमर होण्याची शक्यता वाढते.

कोणतीही सवय अचानक सोडणे कठीण असते. यासाठी जंकफूडचे सेवन करण्याची सवय हळूहळू सोडली पाहिजे. ही सवय सोडताना कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे हे जाणून घेण्यासाठी...
शक्यतो व्हेज बर्गरची ऑर्डर द्यावी


नॉनव्हेज बर्गरमध्ये क्रिस्पी किंवा फ्राइड स्टफ ऐवजी ग्रिल्ड चिकन मागू शकता.


फ्रेंच फ्राइजच्या ऐवजी बेक्ड पोटेटो चिप्सची ऑर्डर देऊ शकता. कारण हा पोषक पर्याय आहे.


सॅलड आरोग्यासाठी चांगले असते, पण सॅलडचे ड्रेसिंग करताना हायफॅट चीजऐवजी लो फॅट चीजचा वापर करावा.


सोडा ड्रिंक्सऐवजी कमी गोड थंड चहा किंवा पाणी घ्यावे. हे फायदेशीर ठरते.


59 % युवकांना अनियमित जीवनशैलीमुळे फास्टफूड रेस्टॉरंटमध्ये जाण्याची सवय लागली आहे.

60 % तरुण फास्टफूड रेस्टॉरंटमध्ये जाऊन फ्रेंच फ्राइज आणि सोडा घेण्यास प्राधान्य देतात.

76 % महिला आणि 33 टक्के युवक विद्यार्थी मान्य करतात की ते जेव्हा जास्त तणावात असतात तेव्हा फास्टफूड खाण्याची इच्छा वाढते.
थोडे नवीन जरा जुने