दीर्घकाळ आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी जीवनसत्वे आहेत आवश्यक !

ह्रदयविकार, कर्करोग आणि डिमेन्शिया व अल्झायमरसारख्या मज्जासंस्थेशी संबंधित आजारांपासून बचाव व दीर्घायुष्यासाठी काही प्रकारची जीवनसत्वे आणि खनिजे अतिशय आवश्यक असतात. शास्त्रज्ञांनी सांगितले की, योग्य प्रमाणात ३० प्रकारची जीवनसत्वे आणि आवश्यक खनिजे सेवन केल्यामुळे व्यक्तीला दीर्घ आयुष्य जगता येते. 


याव्यक्तिरिक्त ११ अन्य पदार्थांचाही दीर्घायुष्यासाठी आवश्यक जीवनसत्वांमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. खरेतर शरीरातील पेशींमध्ये आढळून येणाऱ्या विविध प्रकारच्या एंजाइमसाठी जीवनसत्वे आणि खनिजे अतिशय आवश्यक आहेत. 'ड' जीवनसत्व तसेच मॅग्नेशियम डीएनएन आणि ह्रदयरोगांपासून संरक्षण करणाऱय एंजाइमसाठीही गरजेचे असते. 

पोषक घटकांची कमतरता असल्यामुळे त्यांना शरीरात पोहोचविणे आवश्यक आहे. त्यामुळे रोगांपासून आपला बचाव करण्यात मदत होते. अमेरिकेतील चिल्ड्रन हॉस्पिटल ऑकलँड रिसर्च इ्स्टिटट्यूटच्या शास्त्रज्ञांनी हे अध्ययन केले असून त्यांनी सांगितले की, निरोगी व धडधाकट राहण्यासाठी जीवनसत्वांची नितांत गरज असते. त्यासाठी रोजच्या आहारात कार्बोहायड्रेटच्या जागी फळे व भाजीपाल्याचे जास्त सेवन करायला हवे.
थोडे नवीन जरा जुने