आणि रोहित पवारांनी केला मोदींना कॉल, म्हणाले 'नमस्ते मोदीसाहेब.......'


अहमदनगर : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार  यांनी संगमनेरमध्ये भर कार्यक्रमात मंचावरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन लावला. संगमनेरच्या ‘अमृतवाहिनी महाविद्यालया’त  ‘संवाद तरुणाईशी’नावाचा युवा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमात अवधूत गुप्ते यांनी सर्वाना एक टास्क दिला. एखाद्या व्यक्तीला फोन लावतोय असं भासवत त्यांच्याशी संवाद साधायचा, असा तो टास्क होता. या टास्कवेळी कर्जत जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन लावला.

“नमस्ते मोदी साहेब, रोहित पवार बोलतोय. नाव आपण ऐकलं असेल. साहेब काही नाही, थोरात साहेबांनी संगमनेरमध्ये कार्यक्रम ठेवला होता. त्याठिकाणी आलो होतो. अनेक युवक-युवती आले आहेत. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची सत्ता आली आहे. त्यामुळे गेली पाच वर्ष जो विकास झाला नव्हता तो आता होईल.”

 या कार्यक्रमात प्रसिद्ध पार्श्वगायक अवधूत गुप्ते यांनी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री आदिती तटकरे, आमदार रोहित पवार , धीरज देशमुख, ऋतुराज पाटील, झिशान सिद्धकी यांना बोलतं केलं.
थोडे नवीन जरा जुने