'हे' उपाय केल्याने, पांढरे केस पुन्हा काळे होतील आणि केस गळतीही थांबेल !


अलिकडच्या काळात अकाली केस पांढरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. कमी वयात केस पांढरे होणे म्हणजे चिर तारुण्यात म्हातारपण आल्यासारखे वाटते. 

धकाधकीच्या जीवनात केसांची काळजी घेणे आपल्याला शक्य नसते. तर बहुतेकांना कामाचा ताण आणि प्रदूषणामुळे अकाली पांढर्‍या केसांचा सामना करावा लागतो. केस काळे करणे अथवा कलर करणे हा यावर एकमात्र उपाय नाही. काही घरगुती उपचार करून पांढरे केस पुन्हा काळे करू शकतात.

जाणून घ्या, पांढरे केस काळे करण्याचे घरगुती उपाय...
अद्रक मिक्सरमध्ये बारीक करून घ्या, त्यानंतर त्याचा रस गाळून घ्या. अद्र्काच्या रसामध्ये मध मिसळून हे मिश्रण केसांना लावा. एक तासानंतर केस धुवून घ्या. वारंवार हा उपाय केल्यास कमी वयात पांढरे झालेले केस काळे होतील.

कच्च्या पपईची पेस्ट डोक्याला दहा मिनिटांपर्यंत लावून ठेवल्याने केस गळत नाहीत आणि कोंडाही होत नाही.

दूध अथवा दह्यात बेसन पीठ घालून केसांवर लावल्याने लाभ होतो.
भोपळा वाळवून नारळाच्या तेलात उकळून घ्या. हे तेल गाळून बाटलीत भरून ठेवा. दररोज या तेलाने मसाज केल्यास केस काळे होतील.

दररोज केसांवर कांद्यांची पेस्ट लावल्याने पांढरे केस काळे हो़ऊ लागतील.

तीळ खावेत तसेच तीळ तेल केसांवर लावावे.
पेरूच्या झाडाच्या पानांची पेस्ट करून केसांना लावल्यास लाभ होईल.

केस धुण्यापूर्वी ऐलोवेरा जेलने केसांची मसाज करावी. केस काळे होतील.

२५० ग्रॅम मोहरीच्या तेलामध्ये मेंदीची पान उकळून घ्या. त्यानंतर तेल गाळून बाटलीत भरून ठेवा, दररोज रात्री झोपण्यापूर्वी हे तेल केसांना लावा.


आवळ्याचे काही तुकडे नारळाच्या तेलात उकळून घ्या. आवळ्याचे तुकडे काळे होईपर्यंत तेल उकळा. हे तेल दररोज केसांना लावल्यास पांढरे केस काळे होतील.

अर्धा कप दह्यामध्ये चिमुटभर काळे मिरे आणि चमचाभर लिंबाचा रस मिसळून केसांवर लावावे.

दररोज साजुक तुपाने डोक्याची मालिश केल्याने पांढरे केस काळे होण्यास मदत होते.
थोडे नवीन जरा जुने