"ह्या" व्यक्तींसाठी दुध पिणे आहे जास्त फायदेशीर,जाणून घ्या !


दूध हे मधुर, स्निग्ध, चेहर्‍यावरचे तेज वाढवणारे, सप्त धातुंना पोषण करणारे तसेच शुक्रधातूला वाढवणारे जड व शीतल आहे. दुधाने वाताचे व पित्ताचे आजार कमी होतात; पण कफाचे आजार वाढतात. 

गाईचे दूध हे जीवनीय, रसायन, बुद्धिवर्धन, बल्य तसेच स्तन्यवर्धक आहे. निस्तेज, नाजूक, दुर्बल, श्रम, भ्रम, श्वास, कास, अतिक्षुधा व रक्तपित्त यावर गाईचे दूध घेणे अतिउत्तम. म्हशीचे दूध, गाईच्या दुधापेक्षा अधिक जड व थंड असून, ज्यांना खूप भूक लागते व झोप येत नाही अशा लोकांना फायदेशीर आहे.

रोज सकाळी कोणत्याही प्रकारचा व्यायाम केल्याशिवाय दूध पिऊ नये.स्त्रीचे दूध, वात, पित्त, रक्तदोष तसेच डोळ्यांच्या आजारावर, तसेच लहान बालकांना पोषणासाठी अतिउत्तम आहे. 

निरोगी राहण्यासाठी सकाळी 8 वाजता 1-2 कप दूध, तसेच सायंकाळी 4 वाजता 1-2 कप दूध पिणे उत्तम; पण रात्री दूध शक्यतो घेऊ नये. 

ज्यांना सर्दी कफ, दमा अंगावर पित्त उठणे, वाढलेले वजन, आळस याचा त्रास आहे. त्यांनी दूध घेऊ नये. घ्यावेच वाटले तर सुंठयुक्त सिद्ध दूध कमी प्रमाणात घेणे. योग्य प्रमाणात घेतलेले दूध, हाडांना बळकटी देते. 

तसेच हाडातील कॅल्शियम योग्य प्रमाणात ठेवते लहान मुलांना दूध देताना, शतावरी, अश्वगंधा विदारिकंद इ. आयुर्वेदिक औषधांचे ग्रॅन्युअल्स किंवा चूर्ण टाकून दूध दिले तर ते शक्तिवर्धक तसेच बुद्धिवर्धक म्हणून काम करेल मुले नेहमी आजारी पडणार नाही. तसेच मुलांची व्याधी प्रतिकारशक्ती वाढेल. 

दूध अधिक हळद याचा लेप चेहर्‍यावर लावल्यास चेहर्‍यावर तेज येते तसेच काही प्रमाणात चेहर्‍यावरील वांग सुद्धा कमी होते. दूध तसेच त्याच्या पदार्थाचा योग्य पद्धतीने वापर करून शरीरातील आजार नाहीसे केले गेले तर दुधांत साखरच पडली म्हणायची.
थोडे नवीन जरा जुने