वाईट माणसांचा नाही तर त्यांच्यातील वाईट प्रवृत्तीचा नाश कर


अगदी लहानपणापासून आपण शाळेत, मंदिरात, पसायदान ऐकत आलोय. अनेक शाळांच्या प्रार्थनेमध्ये सुद्धा पसायदान चा समावेश असतो. संपूर्ण पसायदानात जे काही मागितले ते त्यांच्या लेकरांसाठी  ( विश्वातील संपूर्ण मानव ) मागितले. जे वाईट विचारांचे आहेत त्यांच्याबद्दल माऊली म्हणतात,
जे खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रती वाढो । भूतां परस्परे पडो । मैत्र जीवांचे ॥
संत ज्ञानेश्वर महाराज भगवंताकडे मागणे मागतात की, या जगामध्ये जे काही वाईट प्रवृत्तीचे लोक आहेत, त्या वाईट माणसांचा नाही तर त्यांच्यातील वाईट प्रवृत्तीचा नाश कर. कारण कुठलाही मनुष्य हा कधी वाईट नसतो तर त्याच्यामध्ये असलेले गुण वाईट असू शकतात.

तू फक्त तेवढे वाईट गुणच काढून टाक आणि त्यांच्यातील वाईटपणा काढून टाकल्यावर त्यांच्या सत्कर्मामध्ये वाढ कर. हे जर केलेस तर नक्कीच या पृथ्वीतलावरील सर्व जीव प्रेममय होऊन जातील.  प्रत्येक मनुष्य सत्प्रवृत्तीमधून देवत्वाकडे वाटचाल करू शकतो हा त्यांना विश्वास आहे. प्रत्येकाने दररोज किमान एकदातरी पसायदान म्हणावे.
थोडे नवीन जरा जुने