कोंडा झालाय, केसही गळतात ? तर मग हे घरगुती उपाय करून पहा,होईल फायदा!


स्त्री आणि पुरुष यांच्या सौंदर्याचा केसहे सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे.  केस गळायला लागणे ही मोठी समस्या ठरते. तसेच आज शहरी माणसाला प्रदूषणाच्या वातावरणातच रहावे लागते. वाढत्या प्रदूषणामुळे मानवाला शरीर मनाच्या व्याधींना सामोरे जावे लागत आहे. 

डोळे कमजोर होणे. केस अकाली पांढरे होणे. केस गळणे, अशा समस्या रोजच्याच झाल्या आहेत. 

आज बहुतेक लोकांना डँड्रफच्या समस्येला सामोरे जावे लागते. केसातील कोंडा दूर करण्यासाठी अनेक उपाय केले जातात, मात्र शांपू वापरणे बंद केले की कोंडा पुन्हा येतो. 

कोंडा आपल्या डोक्यातील मृत पेशींपासून बनतो. वातदोषामुळेही कोंडा तयार होतो. यामुळे खाज सुटते आणि केस गळतात. या समस्यांपासून मुक्ती मिळविण्यासाठी काही प्रभावी घरगुती उपाय येथे देत आहोत.

1. खोबरेल तेलात कापूर मिसळून चांगल्या रीतेने केसांना लावा. थोडयाच दिवसात कोंडा निघून जाईल.

2. लिंबाचा रस केसांना लावा आणि थोड्या वेळाने केस धुवून घ्या.

3. खोबरेल तेलात लिंबाचा रस मिसळून केसांना लावा. 

4. दह्याने केस धुवून घ्या. हे सारे उपाय साधे सोपे असले तरी प्रभावी आहेत.
थोडे नवीन जरा जुने