रात्री शांत झोप हवी असेल तर करा हे उपाय!अलीकडे झोप न लागणे ही सर्वात मोठी समस्या होण्याची माणसामध्ये निर्माण झाली आहे. बदलती जीवनशैली त्यामुळे मन , मेंदू सतत ताणात असतो. मग झोप लागण्यासाठी औषधं घेतली जातात ज्यांना निद्रानाशाचा त्रास असतो त्यांना रात्र रात्र झोप लागत नाही. 
झोप न होण्याचा परिणाम मात्र त्याच्या आरोग्यावर होतो. रात्री झोप न झाल्यामुळे शरीरात उष्णता वाढते व तोंड येतं, पोट बिघडतं. त्यामुळे तुमच्या खाण्यापिण्यावरवर त्याचा परिणाम होतो. झोप न झाल्यामुळे दिवसभर झोप घ्यावीशी वाटते, त्यामुळे तुमच्या कामावरही त्याचा परिणाम होतो. त्यामुळे चांगलं आरोग्य राहण्यासाठी तुम्हाला झोप घेणे आवश्यक आहे. यासाठी वेळेत झोपणे फार आवश्यक आहे.

झोपण्यापूर्वी अंघोळ करा, त्यामुळे तुम्हाला फ्रेश वाटेल व शांत झोप लागेल.

झोपण्यापूर्वी थोडावेळ ध्यान करा, म्हणजे मनातील दिवसभरातील सर्व विचार निघून जातील. झोपण्यापूर्वी एखादं पुस्तक वाचा, वाचल्यामुळे तुमचा मेंदू थकेल, झोपण्यापूर्वी रोज दूध घेण्याची सवय लावून घ्या, त्यामुळे तुमच्या मेंदूला शांत वाटेल. झोपताना मोबाइल न बघता तो दूर ठेवा.

उपाशीपोटी झोपू नका, भुकमुळे झोप लागत नाही. त्यामुळे रात्रीचे जेवण हुलक घ्या; पण जेवण टाळू नका, जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा झोपण्याच्या थोडे आधी दिवे विझवून, डोळे मिटून पडून राहा.

सर्वांग शिथिल करा, कुठलाही विचार डोक्यात आणू नका. थोड्याच वेळात तुम्हाला झोप लागेल.
थोडे नवीन जरा जुने