आयुष्यभर फिट राहायचे असेल तर,जेवणाच्या बाबतीत हि काळजी घेतलीच पाहिजे !


अन्न चावून खा - 
अन्न चावून चावून खा. यामुळे अन्न सहज पचण्यास मदत होते. परिणामी अपचनाच्या त्रासापासून मुक्ती होते. जास्त प्रमाणात खाणं रोखायचं असेल तर हा सोपा आणि  प्रभावी उपाय आहे. दिवसभराच्या कामांची यादी बनवा. तणावाला दूर ठेवण्यासाठी हा सगळ्यात प्रभावी उपाय करा. 


कामांचा प्राधान्यक्रम ठरवा आणि त्यानुसार कामं करा. एकानंतर एक काम करत जा. एकाच वेळेस अनेक कामं लक्षात ठेवता येत नाही. यामुळे तणाव येतो. यामुळे डोकेदुखी, नैराश्य आणि उच्च रक्तदाब यांसारख्या तणावाशी संबंधित आजारांचा सामना करावा लागतो. 

वेळेवर जेवण करा - 
निरोगी शरीरासाठी योग्य आहार घेणं खूप आवश्यक आहे. त्याचबरोबर वेळेवर जेवण करणं हे देखील तितकच गरजेचं आहे . आपण दररोज काय खातो, यावर आपलं आरोग्य अवलंबून असतं.हेक्टिक जीवनशैलीत जर तुम्ही तुमच्या आहाराकडे व्यवस्थित लक्ष दिलं तर आजार कोसो दूर राहतील.

रोजच्या आहारात त्या सगळ्या पदार्थाचा समावेश करा, ज्यामध्ये फळे, भाज्या, दुग्धजन्य उत्पादन , मटण , मासे आणि अन्य प्रथिनयक्तु् पदार्थाचा समावेश असेल. वजनावर नियंत्रण - वजनावर नियंत्रण ठेवा . खरंतर आपलं वजन वय , अनुवंशिकता, लिंग आणि उंची यावर अवलंबून असतं. 

अधिक वजनामुळे उच्च रक्तदाब , हृदयाशी संबंधित आजार , मधुमेह, वेगवेगळ्या प्रकारचे कर्करोग आणि अन्य प्रकारच्या आजारांना आमंत्रण मिळतं.
थोडे नवीन जरा जुने