चेहऱ्यावरच्या अनावश्यक केसांपासून मिळवा मुक्ती फक्त एवढाच करा...मुली नेहमी आपल्या चेहऱ्यावर असलेल्या अनावश्यक केसांना कंटाळतात. या अनावश्यक केसांपासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही घरगुती काही उपाय करू शकता. घरगुती उपायाचे काही दृष्यपरिणाम नसतात. त्यामुळे याचा उपयोग केल्यास खूप प्रभावशाली ठरतो.

चेहऱ्याच्या सुंदरतेसाठी मुली काय काय करतील याचा ठावठिकाणा नसतो. महागड्या क्रिमपासून पार्लरपर्यंत सर्व उपाय मुली करत असतात. मात्र हवातसा फरक जाणवत नाही.

त्यात चेहऱ्यावरचे अनावश्यक केस चेहऱ्याची सुंदरता बिघडवतो. या समस्येला पर्याय म्हणून मुली वॅक्सिंग करतात. मात्र वॅक्सिंगमुळे जखम होतात. चेहऱ्यावर लाल चट्टे पडतात.

चेहऱ्यावर असलेल्या अनावश्यक केसांची वाढ काही कारणांमुळे होत असते. हाय टेस्टोस्टेरोन, पीसीओडी किंवा ताण तणावामुळे अनावश्यक केसांची वाढ होत असते. चेहऱ्यावर अनावश्यक केस जास्त असल्यास तुम्ही नैसर्गिक उपाय करणे गरजेचे आहे.

त्यामुळे आज आम्ही तुम्हांला काही घरगुती उपायापासून चेहऱ्यावरच्या अनावश्यक केस कमी करता येईल हे सांगणार आहोत.

हळद आणि उडीद डाळीचा स्क्रब

या स्क्रबला बनवण्यासाठी उडीद डाळीची पावडर बनवून घ्या. या पावडरमध्ये चिमुटभर हळद आणि थोडेसे पाणी मिक्स करा. त्यानंतर ही पेस्ट चेहऱ्याला लावा. चेहऱ्यावर लावून थोड्यावेळेने ते चेहऱ्यावर चोळा.आणि धुवून टाका.

 लिंबू आणि साखर

या स्क्रबला बनवण्यासाठी २ चमचे साखर आणि २ चमचे लिंबाचा रस एकत्र करावा. त्यात थोडेस पाणी मिक्स करावे. त्यानंतर ते मिश्रण चेहऱ्यावर लावून सुकू द्यावे. त्यानंतर १५ मिनिटांनंतर चेहरा धुवावा.

 लिंबू आणि मध

२ चमचे साखर, २ चमचे लिंबाचा रस आणि १ चमचा मध मिक्स करावे. त्यात कॉर्नफ्लोअर किंवा मैदा मिसळवा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावून हलक्या प्रमाणात चेहऱ्यावर सुकू द्यावे. त्यानंतर १५ ते २० मिनिटांनी चेहरा धुवावा.
थोडे नवीन जरा जुने