शुद्ध बीजापासून चांगल्या आणि रसाळ फळांची उत्पत्ती होतेशुद्धबीजा पोटी । फळे रसाळ गोमटी ।।१।।
मुखी अमृताची वाणी । देह देवाचे कारणी ।।२।।
सर्वांग निर्मळ । चित्त जैसे गंगाजळ ।।३।।
तुका म्हणे जाती । ताप दर्शने विश्रांती ।।४।।

तुकाराम महाराज म्हणतात की ज्याप्रमाणे शुद्ध बीजापासून चांगल्या आणि रसाळ फळांची उत्पत्ती होते तसेच येथे ह्या संसारात जे शुद्ध जातीचे आहेत, पवित्र अशी मंडळी आहेत त्यांच्या पासून चांगल्या आणि उच्च दर्जाच्या संततीची निर्मिती होते. 

ते पुढे म्हणतात अशा लोकांची वाणी ही मधुर असून अमृतासमान असते आणि हे लोक स्वतःचा देह देवाची अखंड सेवा करण्यात खर्ची घालवतात.

ते पुढे म्हणतात की अशी माणसे सर्वांगाने निर्मळ असून त्यांचे मन गंगेप्रमाणे निर्मळ आणि पवित्र असते. तुकोबाराय म्हणतात अशा ह्या लोकांच्या नुसत्या दर्शनाने सुद्धा लोकांचे त्रिविध ताप जाऊन त्यांच्या मनाला तात्काळ विश्रांती मिळते.
थोडे नवीन जरा जुने