तिच्या लाल रंगामुळे हिला लाल माठ असं म्हणतात, घ्या जाणून लाल माठ भाजीविषयी!इतर पालेभाज्यांप्रमाणे हीदेखील एक पालेभाजी. नाव जरी माठ असलं तरी तिचे गुणधर्म हे बरेचसे चवळीप्रमाणेच आहेत. तिच्या लाल रंगामुळे हिला लाल माठ असं म्हणतात.

इतर पालेभाज्यांप्रमाणे हीदेखील एक पालेभाजी. नाव जरी माठ असलं तरी तिचे गुणधर्म हे बरेचसे चवळीप्रमाणेच आहेत. तिच्या लाल रंगामुळे हिला लाल माठ असं म्हणतात. यातदेखील भरपूर फायबर आणि पोषकद्रव्यं असतात. हिंदीत ‘बडी चौलाई’, कन्नडमध्ये ‘हरिवे’, संस्कृतमध्ये ‘मारिष’ किंवा ‘मार्ष’ तर इंग्रजीत ‘अमरँथस ट्रायकलर’ अशी नावं आाहेत.


ही अ‍ॅमरॅटेसी कुळातीलच आहे. उष्ण कटिबंधात आशिया, आफ्रिका आणि अमेरिकेत आढळते. हिरवा आणि तांबडा असे दोन प्रकार यात पाहायला मिळतात. राजगिरा, पोकळा आणि तांदुळजा या भाज्यांशी अनेक बाबतीत साम्य दिसून येते. लोह आणि तंतुमय पदार्थाचा भरपूर साठा असलेल्या या भाजीत भरपूर गुणवैशिष्टय़ आहेत.


पाचक असून किडनीचं आरोग्य सुधारतं.

अँटिबॅक्टिरिअल म्हणून काम करते.

श्वसनाच्या विकारावर अतिशय गुणकारी आहे.

पोषणमूल्य असल्यामुळे मुलांच्या वाढीसाठी उत्तम आहे.

शरीरातील कोलेस्टेरॉलवर नियंत्रण ठेवता येत असल्यामुळे मधुमेहींच्या रुग्णांसाठी अतिशय उपयुक्त आहे.

यात लोहाचं प्रमाण अधिक असल्यामुळे अ‍ॅनिमिया परिस्थितीत असलेल्या रुग्णांनी या भाजीचं आवर्जून सेवन करावं.

जीवनसत्त्व अ आणि बिटा केरोटिन असल्यामुळे डोळे, तोंड, नाक आणि पोटाचं आरोग्य सुधारतं.

जीवनसत्त्व ब, लोह, मॅग्नेशिअम, मॅगेनीज, फॉस्फरस आणि झिंकचा भरपूर साठा असल्यामुळे शरीराला आवश्यक असणारी भरपूर ऊर्जा मिळते.

सर्दी आणि संसर्गापासून बचाव होतो.
थोडे नवीन जरा जुने