जादुई वृक्ष शेवगा : शेवग्याची पानं, फुलं, फळ, बिया, साल, मूळ, यांचा अभिनव औषधीय फायदे !


शेवग्याच्या झाडाचे महत्त्व सहजीवन आणि भाजीसाठी शेंगा एवढय़ापुरते मर्यादित नाही. इंग्रजीमध्ये शेवग्याला ‘चमत्कारी वृक्ष’ (मिरॅकल ट्री) म्हणतात. दक्षिण मध्य भारतात उदय झालेल्या या झाडाचे खूप सारे उपयोग आहेत, जे की बहुतेक लोकांना माहीत नाहीत. 

याची पानं, फुलं, शेंगा, बिया, साल आणि मुळं अशा सर्वच गोष्टींचा खाद्यपदार्थ म्हणून वापर केला जातो. या सर्वाचे औषधी गुणधर्म देखील आहेत.

शेवग्याच्या पानाच्या पावडरचा उपयोग कुपोषण थांबवण्यासाठी पोषक आहार म्हणून केला जातो. या पानांमध्ये अनेक जीवनसत्त्वे आणि फायटोकेमिकल संयुगे असतात. ही पाने वाळवून त्याची पावडर पेयांमध्ये वापरता येते, तर त्याच्या फुलांचा वापर चहासाठी होऊ शकतो. शेवग्याची पानं, फुलं, शेंगा, बिया, साल आणि मुळं ही कॅप्सुल स्वरूपातही विकली जातात.

ही वनस्पती कशी बहुउपयोगी आहे ते पाहू या..

सूज कमी करते

पचनक्रियेशी संबंधित आजार शेवगा सेवनाने नष्ट होतात.

संधिवात तसेच स्नायूदुखीवर अत्यंत गुणकारी.

सौंदर्यप्रसाधनांमध्येही वापर केला जातो.

 उच्च प्रमाणात ल्युटिन असल्याने शेवग्यामुळे दृष्टीही चांगली राहते.

 मुधमेहींच्या दृष्टीने अतिशय गुणकारी. यामुळे साखरेचे प्रमाण कमी राहते.

ही भाजी वातनाशक व पित्तनाशक आहे. हृदय व रुधिराभिसरण क्रिया यामुळे सुधारतात.

 अल्सर ठीक करण्यासाठी, टय़ुमर रोखण्यासाठी आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी शेवगा फायदेशीर ठरतो.

घशातील खवखव, कफ, सर्दी, श्वास घेताना त्रास होणं यांसारख्या समस्या असतील, तर शेवग्याच्या शेंगांचे कपभर सूप प्यावं. यामधील पोषक तत्त्व श्वसनमार्गातील टॉक्सिक घटक कमी करण्यासाठी मदत करतात. तसेच टीबी, ब्रोन्कायटीस, अस्थमा यांसारख्या फुफ्फुसांच्या आजारांमध्येही शेंगा उपयुक्त ठरतात.
थोडे नवीन जरा जुने