केस अगदी घनदाट आणि लांबसडक हवे आहेत ?


मुंबई : लांब केस अनेक मुली आणि महिलांना आवडतात. आपले केस लांब, काळे आणि घनदाट असावे अशी अनेक तरुणींची इच्छा असते. पण अनेक जणींना केस गळण्याच्या समस्येला सामोरं जावं लागतं. त्यामुळे केसांची नैसर्गिक वाढ ही खुंटते. जर आपल्याला आपले केस अगदी घनदाट आणि लांबसडक हवे असल्यास आपल्याला काही गोष्टी नक्कीच लक्षात ठेवाव्या लागतील.

अनेक तरुणी आणि महिला यांना सवय असते की शॅम्पूने केस धुतल्यानंतर ते केस टॉवेलने बांधतात. पण तुम्हाला हे माहित नाही की, आपल्या या चुकीच्या सवयीमुळे केसांचं किती नुकसान होतं. ओले केस हे जास्त गळतात. अशावेळी त्यांना टॉवेलमध्ये घट्ट बांधल्याने केस गळण्याची समस्या आणखी वाढू शकते. अशावेळी ओले केस बांधण्यासाठी टॉवेलऐवजी कॉटन टी-शर्ट किंवा मायक्रोफायबर टॉवेलचा वापर करा.

जर आपण आपले केस घट्ट बांधत असाल तर आपल्याला ही सवय तात्काळ बदलावी लागेल. कारण की घट्ट केस बंधाल्याने आपल्या हेअर फॉलिकल्सवर प्रेशर येतं. त्यामुळे केस कमकुवत होऊ तुटू लागतात. त्यामुळे शक्य असेल तेवढे केस हलके बांधा किंवा मोकळे सोडा. जर केस बांधायचेच असतील तर लक्षात ठेवा की जास्त घट्ट बांधू नका.

केसांचा खालील भाग हा पातळ कमकुवत असतो. त्यामुळे केसांची वाढ होत नाही. अशावेळी योग्य कंडिशनर वापरणं गरजेचं आहे. अशावेळी शॅम्पूसोबत कंडिशनर देखील वापरल्यास केस कमकुवत होत नाही. त्यामुळे तुमचे केस मजबूत होऊन त्यांचनी वाढ देखील योग्य पद्धतीने होते.

जर आपल्याला आपले केस मजबूत आणि त्यांची नैसर्गिक वाढ हवी असल्यास आपण थोड्याशा गरम तेलाने मालिश करावी. याने फक्त तुमचे केसच चांगले राहत नाही तर हे स्ट्रेस बस्टरचं देखील काम करतं. दर आठवड्याला जर आपण नारळ तेल, लव्हेंडर ऑईल गरम करुन लावल्यास तुमच्या केसांना एक प्रकारे मजबुती येईल. तसेच केस गळणं देखील बरंच कमी होईल.
थोडे नवीन जरा जुने