मोबाईलचा अतिवापर करणे टाळाच,नाहीतर 'हा' भयंकर आजार होऊ शकतो !


मोबाईलच्या अत‍ि वापरामुळे ब्रेन कँन्सरचा धोका होऊ शकतो, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. मोबाईलवर संभाषण करताना कानाला लावला जातो. 

त्यामुळे मोबाईलमधून बाहेर पडणार्‍या रेडिओ फ्रिक्वेन्सी इलेक्ट्रोमॅग्नेटिक फिल्ड आपल्या मेंदूत शिरतात आणि आपल्याला मेंदूचा कर्करोग होण्याची शक्यता असते. 

हा धोका टाळण्यासाठी टेक्सट मेसेज, ईअरफोन असलेल्या हँड्‍स फ्री उपकरणांचा वापर करणे चांगले असल्याचा सल्लाही आरोग्य संघटनेच्या अभ्यासकांनी दिला आहे. फ्रान्समधील लियोन येथील परिषदेत याबाबात माहिती देण्यात आली. 

मोबाईलमधून निघणारे रेडिएशन एक्सरे सारखे नसते. मात्र ते कमी क्षमतेच्या मायक्रोवेव्ह रेडिएशनसारखे असते. 

याचा अर्थ मोबाइल कानला लावून दीर्घकाळ बोलणे मायक्रोवेव्हमध्ये पदार्थ शिजवण्यासारखे असते. त्याचा स्मरणशक्तीवरही विपरीत परिणाम होऊ शकतो, असे यावेळी सांगण्यात आले.
थोडे नवीन जरा जुने