तुम्हाला माहित आहे का? घोरण्याची समस्या देते 'ह्या' भयंकर आजाराची चेतावणी...


घोरण्याच्या समस्येने अनेकवेळा पीडित अनभिज्ञ असतो, कारण माणूस झोपेतच घोरत असतो. मात्र, तज्ज्ञांच्या मते एकदा या समस्येचा उलगडा झाल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष करू नये.
तुम्हालासुद्धा झोपेत घोरण्याची सवय असेल तर याकडे गांभीर्याने पाहावे. या सवयीला स्लीप अ‍ॅप्निया (अश्वसन) असे म्हणतात. हा एक प्रकारचा झोपेचा आजार (स्लीप डिसऑर्डर) आहे. हा अनेक आजारांचे पूर्वसंकेतही असू शकतो.


काय आहे स्लीप अँप्निया?


जेव्हा झोपेत श्वास घेण्याची प्रक्रिया बाधित होते तेव्हा त्याला स्लीप अ‍ॅप्निया म्हणजेच घोरण्याची समस्या असे म्हणतात. श्वासनलिका चोक झाल्यामुळेच आवाज ऐकू येतो. अशावेळी पीडिताचा श्वास काही सेकंदांपर्यंत थांबू शकतो. ही प्रक्रिया एका तासात 30 वेळा किंवा यापेक्षा जास्त असू शकते. हे अनेक बाबतीत घातक आहे.


का घोरते व्यक्ती?

जे लोक नेहमी घोरतात त्यांच्या गळ्याचे टिश्यू किंवा नाकाचे टिश्यू खूप जास्त असतात. जेव्हा झोपताना काही कारणांनी पीडिताच्या नाकातून किंवा तोंडातून हवा सहजपणे येऊ शकत नाही तेव्हा घोरण्याचा आवाज येतो. झोपण्याची चुकीची पद्धत किंवा गळ्याचे कोमल टिश्यूज असामान्य होणे इत्यादी अनेक कारणांमुळे श्वासनलिका अरुंद किंवा बाधित होऊ शकते.


हे होतात प्रभावित

साधारणपणे घोरण्याची समस्या लठ्ठ लोकांनाच असते, परंतु तज्ज्ञांच्या मते असे सामान्यत: 40 वर्षांनंतरच होते. अनेकवेळा गळा, टॉन्सिल्स (घसाग्रंथी) जिभेचा आकार मोठा होणे, जबड्याचे हाड लहान होणे, आनुवंशिकता, सायनस किंवा अँलर्जीमुळे नसल ऑब्स्ट्रक्शन (नाक बंद होणे) झाल्यामुळे 40 वर्षे होण्यापूर्वीच ही समस्या उद्भवू शकते.


जोखीम वाढेल

झोपेत वरचेवर श्वास अडखळल्यास मेंदूला पुरेसा ऑक्सिजन पुरवठा होत नाही. परिणामी पीडित व्यक्तीला पुरेशी झोप होत नाही. दुसर्‍या दिवशी दिवसभर थकवा जाणवतो. आळस जास्त प्रमाणात राहिल्याने शरीर दमल्यासारखे राहते. अशात पीडित व्यक्तीला उच्च रक्तदाब, अनियमित हृदयगती, हृदय रोग किंवा पक्षाघाताचा धोका वाढतो.


व्यायाम करण्यास प्राधान्य द्या

या समस्येपासून वाचण्यासाठी पीडित व्यक्तीने नियमित व्यायाम केला पाहिजे. वजन नियंत्रणात ठेवणे हा यावरचा सर्वात चांगला उपाय आहे. त्याच प्रमाणे रात्रीच्या वेळी अल्कोहोल आणि धूम्रपानापासून लांब राहिले पाहिजे. वेळेवर झोपणे आणि लवकर उठण्याची सवय सुद्धा या आजारावर उपयुक्त ठरते.
थोडे नवीन जरा जुने