लठ्ठपणा दूर करण्यासाठी सफरचंदही ठरेल फायदेशीर !


प्रत्येक आजारावर सफरचंद हा एक उत्तम उपाय असल्याचं सगळ्यांकडून सांगण्यात येतं. आपल्याला आरोग्यपूर्ण जीवनशैली हवी असेल तर दररोज एक सफरचंद खाणं सुरू करा. 

सफरचंदातील विशेष तत्वामुळं लठ्ठपणा संबंधित आजार दूर राहतात. वॉशिंग्टन स्टेट यूनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी हा शोध लावलाय. ग्रॅनी स्मिथ जातीच्या सफरचंदामध्ये नॉन डायजेस्टर घटक भरपूर मात्रेत असतात.

संशोधक ग्युलिना नोरात्तो यांनी सांगितलं की, आम्हाला आढळलं की ग्रॅनी स्मिथ सफरचंदामध्ये असलेल्या नॉन डायजेस्टर घटकांनी लठ्ठ उंदरांच्या विष्ठेतील जीवाणूंना परिवर्तित करून बारिक उंदरांसारखं केलं. ग्रॅनी सफरचंदमध्ये असलेले नॉन डायजेस्टर घटक मोठ्या संख्येत शरीरात अनुकूल अशा जीवाणूंच्या उत्पत्तीसाठी उपयुक्त ठरतात.

सोबतच जेवणात फायबर आणि पॉलिफेनॉल आणि कार्बोहायड्रेटचं प्रमाण संतुलित ठेवण्यात मदत होते. नोरात्ता यांनी सांगितलं की, पोटातील आरोग्यवर्धक जीवाणूंचं संतूलन, पाचनक्रियेला ते स्थिर ठेवतं. 

जे लठ्ठपणा आणि सूज तसंच जेवणातील तृप्तीच्या भावनेसाठी जबाबदार असतात. हा शोध लठ्ठपणाशी निगडित आजार जसे मधूमेह इत्यादींपासून आपल्याला दूर ठेवण्यात मदत करू शकतो.
थोडे नवीन जरा जुने