पुरेशी झोपच तुम्हाला तणावमुक्त राहण्यासाठी गरजेची आहे...


साधारणत: तणावग्रस्त असल्यावर पीडितास झोप येत नाही, परंतु तज्ज्ञ म्हणतात, अशा स्थितीत भरपूर झोप घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. रात्री जेव्हा पीडित व्यक्ती स्वप्न पाहते, तेव्हा तिचा मानसिक तणाव कमी होण्यास मदत होते, असे नुकत्याच झालेल्या एका संशोधनातून समोर आले आहे. 

कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधकांच्या मते, मानवी मेंदू स्वप्न पाहताना भावनात्मक अनुभवांचाही समावेश करतो. स्वप्न पाहण्याची प्रक्रिया म्हणजे वास्तविक झोपेची रॅपिड आय मुव्हमेंट (आरईएम) फेस असते.

या प्रक्रियेत मानवाचे मन-मेंदू यात चालत असलेली उलथापालथ थांबते. प्रबंधाचे लेखक एल्स डेर हेल्म म्हणतात की, आरईएम स्लीपदरम्यान व्यक्तीच्या विस्मृतीत गेलेल्या जुन्या आठवणी पुन्हा सक्रिय होतात, परंतु स्ट्रेस न्युरोकेमिकल्सचा प्रभाव राहत नाही. 

या संशोधनात सहभागी झालेल्या सुमारे 35 युवकांना दोन गटात विभागण्यात आले होते आणि झोपेत असताना त्यांच्या मेंदूची गतिशीलता जाणून घेण्यासाठी एमआरआय स्कॅनरची मदत घेण्यात आली. 

सोबतच त्यांचे भावनात्मक पैलूही जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. झोपताना भावनांना नियंत्रित करणारा अँमिगडाला नावाचा भाग अधिक सक्रिय होतो आणि यामुळे तणाव कमी होण्यास मदत मिळत असल्याचे एमआरआय स्कॅन केल्यानंतर संशोधकांना आढळून आले.
थोडे नवीन जरा जुने