पोटाच्या विकारासाठी केवळ पचनसंस्थेतील दोषच नाहीत,तर हि सुद्धा कारणे जबाबदार...


पोटाच्या विकारासाठी केवळ पचनसंस्थेतील गडबड किंवा दोषच कारणीभूत नाहीत, तर ताणतणाव आणि मानसिक विकार याला कारणीभूत असतात. वैद्यकीय भाषेत याला ‘आयबीएस’ म्हणजे एरिटेबल बाऊल सिंड्रोम या नावाने ओळखले जाते. 

एका ताज्या संशोधनानुसार जगातील किमान 20 टक्के वयस्कर लोकांना पोटाच्या विकारांनी ग्रासले आहे. जगातील व देशातील 80 टक्के लोक अकारण चिंतेत असतात. 

तणावात राहतात. यासाठी कारणे वेगवेगळी आहेत. मानसिक तणाव, चिंता, दु:ख यामुळे आतड्याच्या कामकाजावर विपरीत परिणाम होतो. त्याची गती बदलते, त्यामुळे पोटाचे विकार सुरू होतात. असे संशोधनांती स्पष्ट झाले आहे.

संशोधकांच्या दाव्यानुसार तणाव, चिंता यामुळे आतडी संवेदनशील बनतात. असामान्य अशा प्रतिक्रिया त्यातून मिळतात. अनेक वेळा हा रोग आनुवंशिक बनतो. आई-वडिलांकडून मुलांमध्येही येतो. 

उपाय - आयबीएसच्या संक्रमणामुळे अनेक लक्षणे दिसायला लागतात. पोटात जागा, गॅसमुळे पोट फुगणे, साफ न होणे, कायम उलटी आल्यासारखे वाटणे, छातीत जळजळ होणे, अशा तक्रारी सुरू होतात. पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये हे प्रमाण दुपटी-तिपटीने अधिक असते.

ही लक्षणे दिसताच शिळे, मसालेदार, तिखट तेलकट अन्न वज्र्य करावे. तसेच खूप गरम किंवा थंड भोजन टाळावे. प्रत्यक्षात आयबीएस हा रोग नव्हे तर रोगाचे लक्षण आहे. त्यासाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे कधीही चांगले.
थोडे नवीन जरा जुने