घराच्या घरीच आठवड्याभरातच त्वचा तजेलदार करण्यासाठी 'या' ४ आयुर्वेदिक औषधांचा करा वापर


खुपसाऱ्या जडीबुटी अश्या असतात की ज्याच्या वापरामुळे चेहरा लवकर उजळतो. हा एक देशी इलाज आहे की ज्यामुळे चेहऱ्याचे काहीही नुकसान होत नाही. 

आजकाल धूळ, प्रदूषण आणि चुकीच्या आहारामुळे त्वचेची चमक कमी होत चालली आहे. हेच कारण आहे की तुम्ही अकाली वयस्कर दिसण्यामागे. 

त्वचेला तंदुरुस्त ठेवण्यासाठी या नैसर्गिक मार्गाचा वापर करून बघा. आज आम्ही तुम्हाला याचबद्दल माहिती देणार आहोत.

 कडुलिंब :

औषधी गुणधर्म असलेल्या  कडुलिंबाचा खूप काळापासून त्वचेसंबंधी उपयोग होतो. यातील अँटी- ईफ्लामेंटरी, अँटी- बॅक्टरियल आणि अँटी- ऑक्सीडेंट हे गुणधर्म त्वचा आणि केस यांसाठी चांगले आहेत अस माननं आहे.

निंबाचे गुणधर्म त्वचेवरील डाग दूर करून त्याद्वारे त्वचेला चमकदार बनवण्यासाठी मदत करतात. याचा उपयोग करण्यासाठी प्रथम लिंबाच्या पानांना पाण्यामध्ये उकळून घ्यावे आणि मग थंड करून त्याने चेहरा साफ करावा. याचा प्रभाव काही दिवसातच दिसून येईल.

चंदन - 

चंदन हे त्वचेसंबंधी समस्या दूर करण्यासाठी खूप महत्त्वाचे औषध आहे. चंदनातील गुणधर्म हे त्वचेवरील तीळ मस दूर करण्यासाठी, त्वचेवरील डाग आणि निर्जीव पणा दूर करण्यासाठी मदत करते. चंदन थंड असल्यामुळे त्वचेची होणारी जळजळ आणि खाज यापासून मुक्ति मिळण्यासाठी मदत करते. हे एक चांगले त्वचा स्वच्छ करण्याचे साधन आहे तसेच ते त्वचेला तजेलदार ठेवण्याचे काम करते. जर तुमच्या त्वचेवर सुरकुत्या, पुळ्या यासारख्या समस्या असतील तर त्या समस्या दूर करण्यासाठी चंदन चांगला उपाय आहे.

केसर -

याचसोबत प्राकृतिक गुणधर्मानी परिपूर्ण अश्या केसर चा उपयोग त्वचा समस्या कमी करण्यासाठी होतो. चेहऱ्यावर याचा लेप लावल्यामुळे त्वचेचा काळसरपणा आणि पुळ्या या समस्या कमी करण्यासाठी मदत होते.

कोरपड - 

चेहऱ्याच्या प्रत्येक समस्या दूर करण्याचा हा एक प्राकृतिक उपचार आहे. हे त्वचेतील घाण दूर करून निर्जीव त्वचेला दूर करण्यासाठी मदत करते. याचसोबत अँटी ऑक्सीडेंट च्या भरपूर प्रमाणामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि पुरळ्या दूर करण्याचे काम करते.

थोडे नवीन जरा जुने