रक्तरंजित स्थानिक निवडणूक : शिवसेना उमेदवाराच्या जावयाची हत्या
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील कन्हान नगरपरिषद आणि पंचायत समिती निवडणुकीला हिंसक वळण लागल. मद्यपान करत असणाऱ्या तिघांनी शिवसेना उमेदवाराच्या नातेवाईकाला बाटल्या भोसकून ठार केलं.
नागपूर जिल्ह्यातील कन्हानमध्ये काल (सोमवारी) रात्री तरुणाची हत्या करण्यात आली. कन्हान नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक ९ जानेवारी रोजी होत आहे. प्रभाग ८ चे शिवसेना उमेदवार डायनल शेंडे यांचे जावई संजू खडसे सोमवारी रात्री एका बारमध्ये मद्यपान करत असताना बाजूच्या टेबलवर बसलेल्या तिघांशी त्यांचे वाद झाले.

थोड्या वेळाने बारच्या बाहेर आल्यावर त्यांच्यात पुन्हा वाद झाले आणि तिघांनी संजू खडसे यांच्यावर चाकूने वार केले व पळ काढला. रुग्णालयात नेण्यापूर्वीच संजू खडसे यांचा मृत्यू झाला होता.

पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला असून पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. बारमधील वादातून हे हत्याकांड घडलं, की याला राजकीय रंगही आहे, याचा तपास नागपूर पोलिस करत आहेत.
थोडे नवीन जरा जुने