"या" आजारांवर फायदेशीर आहेत कडूलिंबाची पाने !


आयुर्वेदात कडुलिंबाच्या औषधी गुणांचा उल्लेख केलेला आहे. पूर्वी अनेकांच्या दारात लिंबाचे झाड असायचे. आजही अनेक घरे, इमारती, सोसायटीच्या प्रांगणात लिंबाची झाडे आढळतात. कडुलिंब या झाडाचा प्रत्येक भाग कोणत्या न कोणत्यातरी आजारावर गुणकारी आहे. कडुलिंबाच्या असाधारण औषधी गुणधर्मामुळे अनेक शारीरिक आजार नाहिसे होतात.


आदिवासी भागांमध्ये कडुलिंबाला एक महत्त्वपूर्ण औषधी वृक्ष मानले जाते. चरक संहिता आणि सुश्रुत संहिता अशा प्राचीन चिकित्सा ग्रंथांमध्ये याचा उल्लेख आढळतो.

कडुलिंबाच्या रहस्यमय गुणांची माहिती आज आपल्याला सांगत आहेत डॉ. दिपक आचार्य (डायरेक्टर- अभ्रुमका हर्बल प्रा.लि.अहमदाबाद) डॉ.आचार्य 15 वर्षापासून मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान राज्यातील आदिवासी भागाचा दौरा करत आहेत. आदिवासींची जीवनपद्धतीचा अभ्यास करत आहेत.

उपाय जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा...

दोन लिटर पाण्यात लिंबाची पन्नासभर पाने टाकावी. पानांचा रंग बदलून पाणी हिरवट होईपर्यंत त्यांना उकळा. हे पाणी गाळून एका बाटलीत भरून ठेवावे. रोज अंघोळ करताना यातील 100 मिली पाणी अंघोळीच्या पाण्यात मिसळावे. यातील एंटीफंगल आणि अँटीबॅक्टेरियल गुण त्वचेला होणारे संसर्ग, व्हाइट हेडची समस्या दूर करतात.लिंबाच्या पानांचा लेप केसांना लावल्यास केस मजबूत होतात.

- लिंब आणि बोराच्या झाडाची पाने गरम पाण्यात उकळून त्या पाण्याने केस धुतल्यास केस गाळण्याची समस्या दूर होईल.

- लिंबोळीचे चूर्ण तयार करून एक-दोन ग्रॅम रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यातून घेतल्यास पोटाचे आजार होणार नाहीत.

- विंचू चावल्यास लिंबाची पानं बारीक करून चावलेल्या ठिकाणी लावल्यास विषाचा प्रभाव कमी होईल.


- लिंबाच्या रसाचे महिन्यातून दहा दिवस सेवन केल्यास हृदयविकाराचा धोका राहत नाही. लिंबाच्या रसाचा उपयोग मलेरिया रोगामध्ये केला जाऊ शकतो. लिंबाचा रस कीटकनाशक, जंतुनाशक आहे.

- लिंबाच्या पानांच्या रसाचे दोन थेंब डोळ्यात टाकल्यास दृष्टी तीक्ष्ण होते.


- आदिवासी लोकांच्या उपायानुसार दररोज लिंबाच्या झाडाची कोवळी गुलाबी पानं चावून-चावून खाल्ल्यास डायबिटीस रुग्णांना आराम मिळतो.
- लिंबाच्या पानांचे ज्यूस डायबिटीस रुग्णांसाठी लाभदायक आहे. नियमित लिंबाच्या पानांचे ज्यूस पिल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते.


संसर्गात उपयोगी
लिंबात संसर्गविरोधी घटक आणि एनाल्जेसिक प्रॉपर्टीज असतात. हे घटक त्वचेला अँलर्जी आणि संसर्गापासून वाचवतात. लिंबाची पाने उकळवून हे पाणी संसर्ग झालेल्या ठिकाणी लावावे. काही दिवसांत फरक पडतो.


- लिंबाच्या पानांचा रस पिल्यास शरीरातील विषारी घटक निघून जातात. त्वचेची कांती उजळते. डायजेशन व्यवस्थित होते.

- लिंबाच्या सालीचा उपयोग केसातील कोंडा आणि उवा कमी करण्यासाठी सुद्धा केला जातो.


नैसर्गिक फेसपॅक

लिंबाची काही पाने आणि संत्र्यांच्या काही साली पाण्यात टाकून उकळा. या पातळ पदार्थात मध, दही आणि सोया मिल्क टाकून पेस्ट तयार करावी. ही पेस्ट चेहर्‍यावर लावावी. या पेस्टमुळे चेहर्‍यावरील त्वचा निरोगी राहते तसेच त्वचेवरील क्रॅक्स, व्हाइट आणि ब्लॅक हेडस नाहीसे होतात. ही पेस्ट आठवड्यातून तीन वेळा लावावी.
थोडे नवीन जरा जुने