प्रत्येक वळणावर तुम्हाला मदत करतील ह्या १६ गोष्टी !


चांगल्या गोष्टी, उपदेश, प्रवचन आदी शब्द ऐकताच स्वताला आधुनिक समजाणारी माणसं नाक मुरडताना दिसतात. यावरून स्पष्ट होते की या मंडळींना या गोष्टींशी काहीही देणेघेणे नाही. अनुभवी आणि वडिलधा-या मंडळींचे म्हणणे असते की काही गोष्टी आवडल्या नाही तरी त्या केल्याच पाहिजेत. उदा. थंडीचे दिवस असले तरी पहाटे पांघरूणातून बाहेर पडणे. 

येथे शेकडो वर्षांच्या अनुभवाने सिद्ध झालेले काही सिद्धांत देत आहोत. या गोष्टी जीवनाच्या प्रत्येक वळणावर तुम्हाला उपयोगी पडतील.

1. गुण नसेल तर रूप व्यर्थ आहे.
2. विनम्रता नसल्यास विद्या व्यर्थ होय.
3. उपयोगी न पडणारे धन व्यर्थ होय.
4. साहस नसेल तर शस्त्र व्यर्थ होय.
5. भूक नसेल तर भोजन व्यर्थ होय.
6. होश नसेल तर जोश व्यर्थ होय.
7. परोपकार न करणा-यांचे जीवन व्यर्थ होय.
8. क्रोधाने अक्कल नष्ट होते.
9. अहंकाराने मन भ्रमिष्ट होते.
10. चिंता आयुष्य खाते.
11. लाच न्यायाला खाते.
12. हाव आपल्या प्रामाणिकपणाला कलंकित करते.
13. दानाने दारिद्य्राचा अंत होतो.
14. लज्जा नसलेले सौंदर्य व्यर्थ होय.
15. चिडलेला मित्र सुहास्य करणा-या शत्रूपेक्षा बरा.
16. माणसाची किंमत त्याच्या दिसण्यावरून नव्हे गुणांवरून होते.
थोडे नवीन जरा जुने