एकटे राहिल्याने मानसिक रोगाला बळी पडण्याची वाढते शक्यता !आजच्या जमान्यात लोक एकटे राहण्याला प्रायोरेटी देताना दिसतात. याबरोबरच शिक्षणाच्या निमित्ताने अनेकजण आपल्या कुटुंबापासून दूर राहतात. पण पुढे जाऊन हीच आपली सवय बनू शकते आणि हीच सवय आपल्या एखाद्या मानसिक रोगाची शिकार बनवू शकते.

नुकत्याच झालेल्या संशोधनातून हि बाब समोर आली आहे की एकटे राहिल्याने मानसिक रोगाला बळी पडण्याची शक्यता खूप जास्त वाढते. यासाठी 16 ते 64 वर्षांपर्यंत च्या लोकांचा अभ्यास केला गेला आहे.
या संशोधनात असे आढळून आले आहे की 1993, 2000, 2007मध्ये एकटे राहणाऱ्या लोकांमध्ये मनोविकाराचा दर क्रमशः 8.8%, 9.8%, 10.7 % एवढा आहे. याव्यतिरिक्त संशोधकांनी एकटे राहणाऱ्या लोकांत आणि मनोरुग्णात एका सामान गोष्ट आढळून आली आहे. तिथेच अभ्यासानुसार वेगवेळ्या ग्रुपमधील लोकांचे संशोधन केल्यानंतर असे आढळून आले की त्या लोकांमध्ये मानसिक विकार होण्याचा धोका 1.39ते 2।.43 पर्यंत वाढते.

जागतिक स्तरावर सामान्य मानसिक विकार चा दर जवळ जवळ 30% आहे. या मानसिक विकाराचा आपल्या जीवनावर खूप गंभीर परिणाम होत असतो.

थोडे नवीन जरा जुने