मेकअप करताना घ्या "ही" काळजी ,अधिकच सुंदर दिसाल !


आपण सुंदर दिसावे असं प्रत्येक महिलेला वाटते. यासाठी अनेक स्त्रिया मेकअप करण्यावर भर देतात; परंतु मेकअप परफेक्ट करणे आवश्यक आहे, कारण लहानशी चूक ही तुमचा लूक खराब करू शकते, त्यामुळे काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. 

सर्वप्रथम कपाळ, गाल, डोळे, नाक, हनुवटी आणि मानेवर क्लिनझिंग क्रिमने संपूर्ण चेहरा मसाज केल्यासारखा हात फिरवा. यानंतर ओल्या कापसाने ही क्रिम व्यवस्थित काढून घ्या. अशाप्रकारे चेहरा स्वच्छ करून घ्या. यानंतर स्कीन फ्रेशनरने चेहरा पुन्हा स्वच्छ करा. कोरडी त्वचा असेल तर कापसाने चेह- यावर मॉइश्चरायजर लावावे.

मेकअप टिप्स - 
त्वचेच्या प्रकारानुसार व रंगानुसार फाउंडेशनची निवड करावी. दिवसा मेकअप करताना तो कधीच डार्क करू नये.

नेहमी लाईट किंवा मध्यम स्वरूपाचा मेकअप करावा.  काजळ लावा, पण मस्करा वापरला नाही तरी चालतो.


 दिवसाच्या मेकअपसाठी आयशेंडोचा रंग तुमच्या डोळ्याच्या रंगाशी मिळता जुळता असावा. दिवसा गडद रंगाचं आयशैडो वापरू नका. लिपस्टिकसोबत लिपग्लॉस वापरावे. 

रात्री झोपण्यापूर्वी मेकअप काढणे आवश्यक असते. यासाठी फक्त पाण्याचा वापर करू नका, तर मेकअप काढण्यासाठी क्लिनझरचा वापर करावा .
थोडे नवीन जरा जुने