हळदीचे 'हे' आरोग्यदायी गुणधर्म तुम्हाला माहित असायलाच हवेत !


हळद, हरिद्रा, कांचनी, पीता, अरशीन आदी नावाने ओळखली जाणारी औषधी वनस्पती आपल्या परिचयाची आहे. आयुर्वेदात तर हळदीला अमृत तुल्य औषधी मानण्यात आले आहे. 

उत्तम अ‍ँटीसेप्टिक म्हणूनही हळदीकडे पाहिले जाते. त्वचारोग, अ‍ॅलर्जी आदीमध्ये हळद गुणकारी आहे. हळद वापरल्याशिवाय स्वयंपाक पूर्ण होणे कसे शक्य आहे. कवेळ स्वयंपाकच कशाला, आपल्याकडेलग्नसमारंभातही हळदीला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

अलीकडेच यूसीएलए जॉन्सन कॅन्सर केंद्रात एक नवीन संशोधन समोर आले आहे. हळदीमध्ये कर्कुमिन नावाचे पदार्थ असते. मनुष्याच्या लाळेत आढळणा-या कॅन्सरच्या कोशिकांची वृद्धी करणारे मार्ग कर्कुमिनमुळे बंद होतात. यामुळे नाक आणि गळ्याच्या ठिकाणी कॅन्सरच्या कोशिकांची होणारी वाढ थांबते.

हळदीचा वापर आपल्या देशात प्राचीन काळापासून होत आला आहे. दुधात हळद मिसळून दूध देण्याचीही आपल्याकडे प्रथा आहे. असे केल्याने जखम भरून यायला मदत होते. हळदीचा लेप दिल्याने वेगाने जखम भरून येते. म्हणूनच हळदीला अमृत तुल्य औषधी म्हटले जाते.
थोडे नवीन जरा जुने