जेवणाआधी या सूचनांचे पालन करा


भोजनाची जागा व जेवणासाठी वापरावयाची भांडी स्वच्छ करा. तसेच  जेवायला सुरुवात करण्यापूर्वी हात, पाय व तोंड स्वच्छ धुऊन झाल्यानंतर जेवायला बसा. टेबल-खुर्चीवर जेवायला बसण्याऐवजी आसन घेऊन किंवा पाटावर बसावे. जेवायला सुरुवात करण्यापूर्वी श्लोक म्हणावा 
वदनि कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे ।
सहज हवन होते नाम घेता फुकाचे ।
जिवन करि जिवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म ।
उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ॥

अन्न देवाला अर्पण करा व नंतर देवाचा प्रसाद म्हणून नामजप करत ग्रहण करा. एकमेकांचे उष्टे अन्न खाल्ल्यामुळे वाईट शक्‍तींचा त्रास होऊ शकतो; म्हणून उष्टे अन्न खाऊ नका. अन्न पायदळी तुडवले जाऊ नये, यासाठी जेवणानंतर ताटाभोवती सांडलेले अन्नकण उचला.
थोडे नवीन जरा जुने