कोवळे उन शरीरासाठी असते खूपच फायदेशीर,फायदे वाचून व्हाल आश्चर्यचकित !मध्यंतरी जागतिक आरोग्य संघटनेतर्फे आहारतज्ज्ञांनी एक सर्वेक्षण केलं. ‘ब’ आणि ‘क’ जीवनसत्त्वाच्या अभावापेक्षा ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता भारतात जास्त असल्याचं या सर्वेक्षणात आढळून आलंय. तर जागतिक पातळीवर एक अब्ज लोकांमध्ये ‘ड’ जीवनसत्त्वाच्या अभावामुळे हाडं, त्वचेच्या आजाराचं प्रमाण अधिक आहे, हेही त्या सर्वेक्षणात नमूद केलंय.
साठ ते सत्तर वर्षापूर्वी शीत कटिबंधात राहणा-या लोकांना मुडदूस (रिकेट्स) नावाचा रोग व्हायचा. मुडदूस म्हणजे हाडं ठिसूळ होणं, दात वेडेवाकडे असणं, वाढ नीट न होणं, दात उशिरा येणं, हाता-पायांची हाडं वाकडी होणं, आतल्या बाजूला वाकणं, त्वचा निस्तेज होणं, फासळयांवर गाठी येणं हे सर्व आजार लहान मुलांमध्ये विशेषत्वाने आढळून यायचे. शास्त्रज्ञांनी २० वर्षापूर्वी असं भविष्य वर्तवलं होतं की, भारतासारख्या सूर्यप्रकाश भरपूर मिळणा-या देशात मुडदूस हा आजार होत नाही.

कारण भारत उष्ण कटिबंधातील देश आहे. पण सध्या भारतात खासकरून मुंबईत हाडं, त्वचेच्या आजाराचं प्रमाण अधिक असल्याचं दिसून आलंय. हे आजार ‘ड’ जीवनसत्त्वाच्या अभावामुळे होतात, हा मुद्दा जागतिक आरोग्य संघटनेतर्फे आहारतज्ज्ञांनी केलेल्या सर्वेक्षणातून अधोरेखित झालाय. ‘ब’ आणि ‘क’ जीवनसत्त्वाच्या अभावापेक्षा ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता देशात जास्त असल्याचं या सर्वेक्षणात आढळून आलंय.कार्य आणि महत्त्व

शरीरात कॅल्शियमच्या शोषणाला मदत करणं आणि रक्तातील कॅल्शियमचं प्रमाण योग्य राखणं. शरीरात कॅल्शियमचं प्रमाण योग्य राखल्याने हाडांची घनता वाढते.

या जीवनसत्त्वामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

रक्तदाब, रक्त शर्करा यांचं संतुलन राखणं.

ऑस्टिओपोरोसिसच्या उपचारांमध्येही ‘ड’ जीवनसत्त्वाची उपयुक्तता असते.

सोरायसिससारखे त्वचारोग तसंच काही प्रकारचे कॅन्सर यांचं प्रमाण कमी करण्यासाठी ‘ड’ जीवनसत्त्वाची मदत होते.

मज्जारज्जूंचं कार्य, मेंदूचा विकास यांच्या अतिरिक्त वाढीला आळा घालणं, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं, नैराश्यांपासून मुक्ती यांच्यासाठीही ‘ड’ जीवनसत्त्वाची मदत होते.

स्तनपान करणाऱ्या मातांनाही ‘ड’ जीवनसत्त्वाची गरज असते. कोरण बाळंतपणानंतर शरीरातील कॅल्शियमचं प्रमाण कमी होतं.

तुटवडा भरून काढण्यासाठी..

सूर्यप्रकाश हा ‘ड’ जीवनसत्त्वाचा प्रमुख स्त्रोत आहे. आठवडयातून सकाळी दहा पूर्वी तीन ते चार वेळा सूर्याच्या कोवळया उन्हात बसावं.

सूर्यप्रकाशाच्या व्यतिरिक्त साल्मन मासे, सारडीन्स मासे, शेळीचं दूध, शायटेक अळंबी, अंडी यांमध्ये ‘ड’ जीवनसत्त्व मोठया प्रमाणावर असतं.

कार्ड लिव्हर ऑईलही ‘ड’ जीवनसत्त्वाचा पूरक स्त्रोत आहे.

हे लक्षात ठेवा...

‘ड’ जीवनसत्त्व कृत्रिम स्वरूपात घेण्यापेक्षा नैसर्गिक स्वरूपात घेणं चांगलं. ‘ड’ जीवनसत्त्वाचं शरीरातील अतिरिक्त प्रमाण हे मूत्रपिंडावर परिणाम करतं. त्यामुळे नैसिर्गिक स्वरूपात ‘ड’ जीवनसत्त्व घेतलेलं चांगलं.
थोडे नवीन जरा जुने