हाय ब्लड प्रेशरवर नियंत्रण मिळवण्यासाठी "हे" घरगुती उपाय नक्की वाचा !हाय ब्लड प्रेशर या दिवसात सामान्य समस्या झाली आहे. हाय ब्लड प्रेशरमध्ये धमन्यांमध्ये रक्त दाब वाढतो. या दबावामुळे धमन्यांमध्ये रक्त प्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी हृदयाला अधिक काम करावे लागते.


अनेक लोक या समस्येवर गंभीर प्रकारे विचार करत नाही. हाय बीपी हृदय रोगाचे कारण होऊ शकते. परंतु काही घरगुती उपाय वापरुन तुम्ही या आजारापासुन वाचू शकता.

ताजे दही

ताजे दही हाय ब्लड प्रेशरच्या रुग्णांना खुप फायदेशीर मानले जाते. एका संशोधनानुसार हाय ब्लड प्रेशर असलेल्या व्यक्तीने भोजनासोबत ताजे दही खाल्ले पाहिजे. जेवणात योग्य प्रमाणात दहीचा वापर करुन हाय ब्लड प्रेशरची समस्या दूर केली जाऊ शकते.

टरबूजच्या बीज आणि खसखस

टरबूजाच्या बीज सोलुन त्यामधील दाना आणि खसखस दोन्हीही समान प्रमाणात घेऊन बारीक करा. हे रोज सकाळ संध्याकाळ उपाशापोटी पाण्यात टाकुन एक चमचा घ्या. एक महिना याचे सेवन करा. हे हाय ब्लड प्रेशरच्या रुग्नांसाठी खुप फायदेशीर असते.

टोमॅटो

लाल टोमॅटोचा वापर हाय ब्लड प्रेशर आणि रक्तातील कोलेस्ट्रॉलला कमी करण्यात मदत करते. ही गोष्ट एका संशोधनात समोर आली आहे. हाय बीपीची समस्या असलेल्या लोकांनी सलादच्या रुपात टमाटर अवश्य खाल्ले पाहिजे.

लिंबूचा रस

लिंबूच्या रसाने रक्त वाहिन्या कोमल आणि लवचीक होतात. यामुळे रक्तदाब सामान्य राहतो. हे हार्टअटॅकचा धोका कमी करते. एक-एक चमचा मध, अदरक आणि लिंबूचा रस कोमट पाण्यात मिळवून आठवड्यातुन दोन-तीन वेळा प्यायल्याने फायदा होतो. हे ब्लड प्रेशरसाठी खुप चांगले टॉनिक आहे.

बीट

रिडिंग यूनिवर्सिटीच्या एका संशोधनात सांगितले आहे की, नियमित बीटाचा एक ग्लास ज्यूस प्यायल्याने रक्तदाब नियंत्रित केला जाऊ शकतो. बीटामध्ये मोठ्या प्रमाणात नायट्रेट असते. ते पचन तंत्रात गेल्यावर नायट्रिक ऑक्साइड बनतात आणि रक्त प्रवाहाला नियंत्रित करुन ब्लड प्रेशर कमी करते. हे मासपेश्यांच्या ऑक्सीजनची गरज कमी करते.

लसुन

रक्त घट्ट होणे हे हाय बीपीचे सर्वात मोठे कारण असते. परंतु लसुन रक्ताला घट्ट होऊ देत नाही. हे कोलेस्ट्रॉलला नियंत्रित करते. अशा प्रकारे लसुन ब्लड प्रेशरला चांगले ठेवण्यास खुप फायदेशीर असते.

अदरक

अधिक कोलेस्ट्रॉल रक्त प्रवाहात अडथळा निर्माण करते. यामुळे हाय ब्लड प्रेशरची समस्या निर्माण होते. अदरकमध्ये अँटीऑक्सीडेंट्स असतात जे कोलेस्ट्रॉलला कमी करण्यात मदत करतात. अदरकमुळे रक्त प्रवाह सुरळीत होतो. धमन्यांच्या आसपासच्या मासपेश्यांनाही आराम मिळतो ज्यामुळे हाय ब्लड प्रेशरची समस्या कमी होते.

इलायची

इलायची अँटीऑक्सीडेंट्स, व्हिटॅमिन सी आणि आवश्यक खनिज पोटॅशियमने भरपूर असते. इलायचीच्या नियमीत सेवनाने बॉडी टॉक्सिक मुक्त राहते. ज्यामुळे रक्त प्रवाह सुरळीत राहतो. हे हाय ब्लड प्रेशरसाठी फायदेशीर असते. यासाठी 200 ग्राम इलायची घेऊन तव्यावर ठेवून राख होऊ पर्यंत भाजा. ही राख बारीक करुन एका डब्बीत भरुन ठेवा. आता मधासोबत याचे सेवन करा. 15 दिवस नियमित प्रयोग केल्याने उच्च रक्तदाब सामान्य होईल.

लालमिर्ची

धमन्यांमध्ये येणा-या समस्यामुळे रक्त प्रवाह सुरळीत होत नाही. यामुळे ब्लड प्रेशरची समस्या होते. लाल मिर्चीच्या सेवनाने उदासीन रक्तवाहिन्या रुंद होता आणि रक्त प्रवाह सुरळीत राहण्यास मदत मिळते. यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो.

कांद्याचा रस

कांद्याचा रस रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करुन ब्लड प्रेशरला नियंत्रित करतो. कांदा रक्त स्वच्छ करुन नर्वस सिस्टमला मजबूत बनवतो. कांद्याचा रस आणि मध समान प्रमात मिळवुन दिवसातुन दोन चमचे एक वेळा घेतल्याने रक्तदाबाची समस्या दूर होते.
थोडे नवीन जरा जुने