अवधूत गुप्ते यांनी आदित्य ठाकरे यांना अभिनेत्री दिशा पटानीवरुन छेडलं
अहमदनगर : संगमनेरच्या अमृतवहिनी महाविद्यालयात संवाद तरुणाईशी या कार्यक्रमात राज्यातील सहा तरुण आमदारांनी संवाद साधला. अवधूत गुप्ते यांनी आदित्य ठाकरे यांना अभिनेत्री दिशा पटानीवरुन छेडलं.

 या कार्यक्रमात अवधूत गुप्तेंनी आदित्य ठाकरे यांना विचारलं, आम्हाला मध्ये मध्ये बातम्या येत असतात, आप कुछ भी बोलो, हमे आपकी बात ‘पटनी’ चाहीए. आपका उत्तर पटानी चाहीए. यावर आदित्य ठाकरे यांनी तुमची ‘दिशा’ चुकलेली आहे, असं म्हणताच एकच जल्लोष झालं.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री अदिती तटकरे, रोहित पवार, धीरज देशमुख, ऋतुराज पाटील, झिशान सिद्दीकी या आमदारांची मुलाखत गायक, संगीतकार अवधूत गुप्ते यांनी घेतली. यावेळी अवधूत गुप्ते यांनी सर्व युवा आमदारांना राजकीय प्रश्न तर विचारलेच पण वैयक्तिक प्रश्नही विचारून धमाल उडवून दिली.
थोडे नवीन जरा जुने