'हि' आहेत कारणे आरती करताना घरात कापुर जाळण्यामागे.


कापराची वडी घरोघरी आरतीसाठी उपयोगात आणली जाते? कापूर हा शुभ्र स्फटिकासारखा दिसतो. विविध कर्मकांडात वापरण्यात येणा-या कापराचे धार्मिक तसेच वैज्ञानिक कारणे आहेत. 

कापूर तीव्र ज्वलनशील आहे. शास्त्रानुसार ज्या घरात नियमित कापूर जाळला जातो, तिथे पितृदोष किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या दोषाचा प्रभाव राहत नाही, देवीदेवतांसमोर कापूर लावल्याने पुण्य मिळते. कापूर लावल्याने वातावरण पवित्र आणि सुगंधित होते. कापराच्या प्रभावाने घरातील वातावरणात देवता लवकर प्रसन्न होतात. 

कापराच्या प्रभावाने घरातील वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. व त्याच्या सुगंधाने आपल्या विचारातही सकारात्मकता येते. 

या मागे वैज्ञानिक महत्त्व म्हणजे कापराच्या सुगंधाने जिवाणू, विषाणू आदी नष्ट होतात. यामुळे वातावरण शुद्ध होते. वातावरण निरोगी असल्यामुळे आजार दूर राहतात. याच कारणासाठी पूजा, आरती व धार्मिक कार्याच्या वेळी कापूर जाळला जातो. 

रात्री झोपण्यापूर्वी कापूर जाळल्यास अनिद्रेची समस्या दूर होते. वाईट स्वप्न पडत नाही. कापडाची वडी कपाटात ठेवल्यास कपडे, पुस्तके आणि वस्तूचे वाळवी आणि मुंग्या अशा कीटकांपासून संरक्षण होते.
थोडे नवीन जरा जुने