रक्तदान करण्याचे हे ४ फायदे तुम्हाला माहित आहेत का?


रक्तदानाला जीवनदान म्हटले जाते. दात्याने दिलेले रक्त एखाद्याचा जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका निभावतो. त्याचप्रमाणे त्याला हार्ट अटॅक आणि कॅन्सरसारख्या रोगापासून दूर ठेवण्यास मदत करतो. रक्तदानाचे इतर सुद्धा काही फायदे आहेत.
1. वजन घटते


एका शोधात ही गोष्ट पुढे आली आहे की, 475 मिली रक्त (एक पिंट) 650 कॅलरी बर्न करण्यास मदत करतो. तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तीन महिन्यांतून एकदा रक्तदान करावे.


2. लोहाचे प्रमाण नियंत्रणात

लोहाची पातळी वाढल्यास व्यक्तीसाठी ते घातक ठरते. लोहाचे प्रमाण वाढल्यास रक्त घट्ट होते. असे झाल्यास विविध आजार होण्याची शक्यता बळावते. रक्तदान केल्याने शरीरातील लोहाचे प्रमाण कमी होते. नियमित स्वरुपात रक्तदान केल्याने रक्त पातळ राहते यामुळे आजारांना दूर ठेवता येते.


3. हार्ट अटॅकपासून रक्षण

अमेरिकन मेडिकल असोसिएशनमध्ये प्रकाशित एका संशोधनानुसार 43 ते 63 वर्षे वयातील व्यक्तींनी प्रत्येक सहा महिन्याला रक्तदान करण्याचा सल्ला दिला आहे. असे केल्यास त्यांना हार्ट अटॅकची शक्यता कमी होते.


4. कॅन्सरचा धोका कमी

1200 व्यक्तींवर साडेचार वर्षे झालेल्या संशोधनानुसार जे लोक वर्षात दोन वेळा रक्तदान करतात, त्यांना कॅन्सर होण्याचा धोका कमी होतो. याचे कारण देखील लोहाचे प्रमाण आहे. लोहाचे प्रमाण वाढल्यास शरीरात फ्री रॅडिकल्स वाढल्याने कॅन्सरची शक्यता वाढते. रक्तदान केल्याने लोहाचे प्रमाण नियंत्रणात राहते.
थोडे नवीन जरा जुने