गुलाबाच्या फुलाचे 'हे' औषधी गुणधर्म तुम्हाला माहित आहे का ?


गुलाबाच्या फुलांना कोमलता आणि सुंदरतेचे प्रतिक मानले जाते. हे फक्त एक सुंदर फुल नसून विविध औषधी गुणांनी भरलेले आहे. गुलाबाच्या फुलामध्ये विविध आजारांवर उपचार करण्याची क्षमता आहे. आज आम्ही तुम्हाला गुलाबाचे काही खास उपाय सांगत आहोत.

झोप येत नसेल किंवा तणावग्रस्त असाल तर रात्री डोक्याजवळ गुलाब ठेवून झोपा. अनिद्रेची समस्या दूर होईल.

गुलाबाच्या पाकळ्या खाल्ल्यास हिरड्या आणि दात मजबूत होतात. तोंडातील दुर्गंधी दूर होते आणि पायरिया रोगातून मुक्ती मिळते.

गुलाबामध्ये व्हिटॅमिन 'सी' अधिक प्रमाणात असते. गुलकंद दररोज खाल्ल्यास हाडे मजबूत होतात. दररोज एक गुलाब खाल्ल्यास टी.बी रुग्णाला लवकर आराम मिळेल.

गुलाबाचे पानं ग्लिसरीन टाकून बारीक करून घ्या. हे मिश्रण ओठांना लावल्यास ओठ गुलाबी आणि कोमल होतील.

गुलाबापासून तयार करण्यात आलेल्या गुलकंदमध्ये गुलाबाचा अर्क असतो. यामुळे शरीराला थंडावा मिळतो. हे शरीराला डिहायड्रेशनपासून वाचवते आणि शरीर ताजेतवाने ठेवते. गुलकंद शरीराला स्फूर्ती देणारे शीतल टॉनिक आहे. यामुळे थकवा, आळस, मासपेशींमधील वेदना दूर होतात.

अर्जुन वृक्षाची साल आणि देशी गुलाब पाण्यामध्ये एकत्र उकळून घ्या. हा काढा दररोज पिल्यास हृदयाशी संबंधित आजार दूर राहतात. हृदयाचे ठोके वाढले असतील तर गुलाबाच्या वाळलेल्या पाकळ्या उकळून तो काढा घ्या.


गुलकंदामध्ये सी, ई आणि बी व्हिटॅमिनचे भरपूर प्रमाण असते. जेवण केल्यानंतर गुलकंद खाल्ल्यास पचनाशी संबंधित तक्रारी दूर होतील.

गुलकंदामध्ये चांगल्या प्रमाणात अँटीऑक्सीडेंट असतात. यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता वाढते. त्वचेसाठी हे खूप फायदेशीर आहे.

चेहऱ्यावर डाग, मुरूमं असतील तर गुलकंदाचे सेवन केल्यास फरक पडेल. अतिउष्णतेमुळे अनेकांच्या शरीरावर फोड येतात. त्यांनी गुलकंद खाल्ल्यास बरीच मदत होते.


डोळ्यांची जळजळ किंवा डोळ्यात धूळ गेल्यामुळे त्रास होत असेल तर गुलाब पाण्याने डोळे धुतल्यास आराम मिळेल.

गुलाबाच्या पाकळ्या बारीक करून याचा लेप डोक्यावर लावल्यास डोकेदुखीमध्ये आराम मिळेल.

रोज सकाळी आणि संध्याकाळी एक चमचा गुलकंद खाल्ल्यास पित्ताचा त्रास कमी होईल.
थोडे नवीन जरा जुने