"अशा" लोकांसोबत कठोर भूमिका घेतलीच पाहिजे !काही लोक असे असतात की, त्यांच्या बाबतीत कठोर भूमिका घेणे आवश्यक असते.
आळशी : काही लोक कर्मावर नाही तर नशीबावर विश्वास ठेवतात. हे लोक सक्षम असूनही काम करत नाहीत व पूर्णपणे कुटुंबावर अवलंबून राहतात. हे लोक स्वत:ची जबाबदारी कधीही ओळखू शकत नाही.या लोकांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देणे आवश्यक असते.

इतरांशी शत्रुत्व घेणारे : 

काही लोकांना लहान लहान गोष्टींवर वाद घालण्याची सवय असते. अशा लोकांना मित्र कमी आणि शत्रुच जास्त असतात. अशा लोकांना त्यांना समजेल अशा भाषेत समजावण्याचा प्रयत्न करावा, तरीही स्वत:चा स्वभाव बदलण्यास तयार नसेल तर अशा व्यक्तीपासून दूर राहणेच योग्य.

धूर्त : 

असे लोक स्वत:च्या फायद्यासाठी इतरांचा वापर करतात. अशा व्यक्ती कोणालाही धोका देऊ शकतात. अशा लोकांना कधीही थारा देऊ नये. या लोकांनी केलेल्या कामामुळे किंवा यांनी दिलेल्या सल्ल्यामुळे इतरांचे फक्त नुकसानच होते.

रागीट : 

ज्या लोकांना खूप जास्त राग येतो, लहान लहान गोष्टींवर शरण्याची भाषा करतात. अशा लोकांची संगत टाळलेलीच बरी.
थोडे नवीन जरा जुने